ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी दिलीप पुलगमकर तर उपाध्यक्षपदी दिनेश लखमापूरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिवरा येथे आज झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवड प्रक्रियेत दिलीप पुलगमकर यांची अध्यक्षपदी, तर दिनेश लखमापूरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका महत्त्वपूर्ण असते. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून शाळेच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

अध्यक्षपदी दिलीप पुलगमकर व उपाध्यक्षपदी दिनेश लखमापूरे यांची निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित समितीचे सदस्य आणि पालकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

नवनियुक्त शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमध्ये विकास विठ्ठल नेवारे, वनिता श्रीकांत चहारे, सपना किशोर सोनटक्के, अश्विनी किरण मुंजनकर, प्रभाकर विश्वनाथ बोरकुटे, सरिता संदिप कुत्तरमारे, दिनकर उद्धव कुत्तरमारे, गिता राजू ठाकूर यांचा समावेश आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये