भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 157 वी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची 122 वी जयंती पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे साजरी
पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांनी फोटोला पुष्पहार वाहून आंदराजली
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 2/10/2026 रोजी भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीं यांच्या जन्म होऊन 157 वर्ष पूर्ण झालेले आहेत व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जन्म होऊन 122 वर्ष पूर्ण झालेले आहेत यानिमित्ताने संपूर्ण भारतभर यांच्या जन्म उत्सव साजरा करण्यात येत असतो यानिमित्ताने वर्धा जिल्हात पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे सुध्दा राष्ट्रपिता महात्मा गांधीं व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांनी महात्मा गांधीं व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली तसेच सहायक पोलीस निरीक्षक अमोल जाधव व सहायक पोलीस निरीक्षक रासकर आणि सहायक पोलीस निरीक्षक धागे व पोलीस उपनिरीक्षक गिंताजली गारगोटे पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी सुध्दा महात्मा गांधीं व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली आणि महात्मा गांधीं यांची 157 वी जयंती आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची 122 वी जयंती पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे साजरी करण्यात आली यावेळी पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते.



