ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 157 वी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची 122 वी जयंती पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे साजरी

पोलीस निरीक्षक देवेन्द्र ठाकुर यांनी फोटोला पुष्पहार वाहून आंदराजली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 2/10/2026 रोजी भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीं यांच्या जन्म होऊन 157 वर्ष पूर्ण झालेले आहेत व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जन्म होऊन 122 वर्ष पूर्ण झालेले आहेत यानिमित्ताने संपूर्ण भारतभर यांच्या जन्म उत्सव साजरा करण्यात येत असतो यानिमित्ताने वर्धा जिल्हात पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे सुध्दा राष्ट्रपिता महात्मा गांधीं व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी पोलीस स्टेशन सेवागाम येथील ठाणेदार देवेन्द्र ठाकुर यांनी महात्मा गांधीं व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

तसेच पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पवार पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक बांम्बर्डे पोलीस उपनिरीक्षक शैलेश जगताप पोलीस स्टेशन सेवाग्राम यांनी सुध्दा महात्मा गांधीं व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली आणि महात्मा गांधीं यांची 157 वी जयंती आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची 122 वी जयंती पोलीस स्टेशन सेवागाम येथे साजरी करण्यात आली यावेळी पोलीस स्टेशन सेवाग्राम येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये