निष्ठावान नेतृत्वाचा गौरव : भास्कर पाटील ताजने यांचा वाढदिवस उत्साहात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावान नेते तथा चंद्रपूर जिल्हाप्रमुख भास्कर भाऊ ताजने यांचा वाढदिवस १ ऑक्टोबर रोजी भद्रावती येथील वृंदावन सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेले पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भास्कर भाऊ ताजने यांना शुभेच्छा दिल्या.
भास्कर पाटील ताजने यांनी आपल्या राजकीय व सामाजिक वाटचालीत पक्षसंघटना मजबूत करण्यासोबतच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार तसेच शिवसैनिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला आहे. कार्यकर्त्यांशी असलेली आपुलकी, जनसामान्यांशी असलेला थेट संपर्क आणि संघटनात्मक बांधणीसाठीची सातत्यपूर्ण धडपड यामुळे जिल्ह्यात त्यांची निष्ठावान व सक्रिय नेतृत्व म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
मान्यवरांची उपस्थिती
वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला महेश केदारी (चिमूर लोकसभा क्षेत्र), माजी जिल्हाप्रमुख अजय स्वामी, राष्ट्रीय ओबीसी अध्यक्ष संजय ढवस, दत्ता बोरेकर, चिमूर-ब्रह्मपुरी विधानसभा संपर्कप्रमुख दिलीप कदम, उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड, विधानसभा प्रमुख बंडू डाखरे, भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकुरे, भद्रावती तालुकाप्रमुख नरेशजी काळे, वरोरा तालुकाप्रमुख विपीन काकडे, भद्रावती शहरप्रमुख बंटी हेमके, वरोरा शहरप्रमुख अतुल नांदे, महिला जिल्हा संघटिका भावना खोब्रागडे, महिला उपजिल्हाप्रमुख मायाताई नारडे, भद्रावती महिला तालुकाप्रमुख विभा बेहरे, शहर संघटक बंडू चटपल्लीवार, तालुका संघटक सचिन डुकरे, ब्रह्मपुरी तालुकाप्रमुख नरेंद्र गाडगीलवार, मिलिंद भनारे, आशिष रणदिवे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी भास्कर भाऊ ताजने यांचा सत्कार करून त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे सभागृहातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते.
पक्षनिष्ठा, संघटनात्मक बांधिलकी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठीचा संघर्ष यापुढेही अधिक जोमाने सुरू राहावा, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.



