यश टेकामची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड
यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचातायक्वांदो क्रीडा स्पर्धेत डंका

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर व तायक्वांदो असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित विभाग स्तरीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या विभाग स्तरीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील यश टेकाम या खेळाडूने चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व केले . विभाग स्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सर्व प्रतिस्पर्धी स्पर्धकाला आपल्या क्रीडा कौशल्याने मात देत नागपूर विभागात प्रथम क्रमांक पटकाविला. त्याने आपल्या यशस्वी क्रीडा कौशल्याने विभागात प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी झेप घेतली आहे.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील खेळाडू जिल्हास्तरीय तायकांदो क्रीडा प्रकारात प्रथम आला व त्यांनी विभागावर चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व केले. विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये यशस्वी व उत्तम क्रीडा कौशल्य दाखवत सर्वांवर मात करत त्याने विभागावर प्रथम क्रमांक पटकावून आपले नाव राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नोंदविलेले आहे. पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये तो नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
त्याच्या या यशस्वी क्रीडा कौशल्याने जिल्हा, विभाग स्तरावर विजय संपादन करून तो आता राज्यस्तरावर खेळणार आहे. त्याची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाल्याने भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, सचिव प्रा. डॉ कार्तिक शिंदे, सहसचिव प्रा. डॉ विशाल शिंदे विश्वस्त श्रीमती नीलिमाताई शिंदे, माजी प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुधीर मोते, क्रीडाशिक्षक प्रा. रमेश चव्हाण, सतीश खेमस्कर व शाळेतील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले व त्याला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
मागील वर्षी सुद्धा याच क्रीडा प्रकारात महाविद्यालयाने विभागीय स्तरावर विभागात विजय संपादन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले नाव नोंदवले होते हे विशेष. त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल जिल्ह्यात, परिसरात त्याचे कौतुक केले जात आहे व शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.



