ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोंभुर्णा ‘ट्रिगर-१’मध्ये; पिकांचे पंचनामे सुरू

दुष्काळी परिस्थितीची प्रशासनाकडून दखल; शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी व ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा : तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची प्रशासनाने दखल घेतली असून, पोंभुर्णा तालुका ‘ट्रिगर-१’मध्ये दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांवर परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पिकांचे पंचनामे सुरू करण्यात येणार आहेत.

पावसाअभावी तसेच प्रतिकूल हवामानामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून शेतपिकांची पाहणी करून पंचनामे करण्यात येणार आहेत.

दरम्यान, शासनाच्या विविध योजना व संभाव्य मदतीचा लाभ मिळण्यासाठी ई-पीक पाहणी आणि ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणीची नोंद तसेच ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार, पोंभुर्णा यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद वेळेत पूर्ण करून प्रशासनाला आवश्यक सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीत पिकांच्या नुकसानीची नोंद आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय मदतीच्या दृष्टीने या प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये