ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धाबा शेतशिवारात वाघिणीच्या पगमार्कने खळबळ; पिल्लांसह वावर असण्याची शक्यता

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण; रात्री शेतात जाणे टाळण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ धाबा वनपरिक्षेत्रातील धाबा शेतशिवारात वाघिणीच्या पगमार्क आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मिथलेश्वर झाडे यांच्या शेतापर्यंत वाघिणीसह तिचे पिल्ले येत असल्याचे सांगितले जात असून, शेतातील पगमार्क कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाबा शेतशिवारात काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा वावर जाणवत आहे. दरम्यान, मिथलेश्वर झाडे यांच्या शेताच्या परिसरात वाघाच्या पावलांसारखे ठसे आढळून आले. अनिल वामनराव डोंगरे यांनी हे पगमार्क आपल्या कॅमेऱ्यात कैद केले असून, ते वाघिणीचे व तिच्या पिल्लांचे असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, पगमार्कची अधिकृत ओळख वनविभागाच्या पाहणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना पहाटे तसेच सायंकाळनंतर शेतात जावे लागते. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या भागात शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात जाणे धोकादायक ठरू शकते.

या पार्श्वभूमीवर धाबा वनपरिक्षेत्रातील वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पगमार्कची पाहणी व नोंद करावी, कॅमेरा ट्रॅप लावून वाघिणीच्या हालचालींचा मागोवा घ्यावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.

दरम्यान, वन्यप्राण्यांचा वावर आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता वनविभागाला तत्काळ माहिती द्यावी. रात्रीच्या वेळी शेतात एकट्याने जाणे टाळावे, समूहाने व प्रकाशाची साधने सोबत घेऊनच आवश्यक असल्यास बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

वाघिणीचा आणि पिल्लांचा वावर असल्यास त्यांना त्रास न देता सुरक्षित अंतर राखणे महत्त्वाचे आहे. वनविभागाच्या पुढील पाहणीत या पगमार्कचे नेमके स्वरूप आणि वन्यप्राण्यांच्या हालचाली स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये