ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवा संकल्प अभियानांतर्गत नशामुक्त भारत जनजागृती कार्यक्रम

जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते नशामुक्त जनजागृती रॅलीचा शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात नशामुक्त भारत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी आयोजित जनजागृती रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या हस्ते झाले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अंकेश केदार व अन्य अधिकारी उपस्थित होते. रॅलीमधे नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थीनी, शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी, अनुदानित वसतीगृहातील विद्यार्थी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जनजागृती रॅली महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापासून निघून जिल्हा परिषद सभागृहात पोहोचली. रॅली समाप्तीनंतर सिंधुताई सपकाळ सभागृहात नशामुक्तीबाबत प्रमुख वक्त्यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण होते. यावेळी श्री.सोमण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सोबतच महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थी तुकाराम घोडे, संघपाल पाटील, सुभाष येनोरकर, नशामुक्ती मित्र हरीश्चंद्र पाल यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले

यावेळी पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांनी विद्यार्थ्यांना चित्रफित दाखवून मार्गदर्शन केले. मानिकधारा बहुउद्देशिय संस्था आष्टीच्या अध्यक्षा प्रतिक्षा दापुरकर यांनीही विद्यार्थ्यांना नशामुक्तीबाबत मार्गदर्शन केले. शेवटी हभप नामदेव काळे महाराज यांनी त्यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. सदर कार्यक्रम जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि इंदिरा गांधी व्यसनमुक्ती केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये