महात्मा गांधी विद्यालय येथे गांधी जयंती निमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान स्व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सत्य व अहिंसेचे महत्व या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. साईनाथ मेश्राम यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे, उपमुख्याध्यापिका माधुरी मस्की, पर्यवेक्षक श्री येडमे सर, प्रा. नंदा भोयर मॅडम, प्रा. आरजू आगलावे मॅडम मंचावर उपस्थित होत्या , सर्वप्रथम महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी प्रशांत धाबेकर सर व भारती घोंगे मॅडम यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे संचालन श्री देवराव जाधव व आभार प्रदर्शन श्री मनोज तोडासे यांनी केले या वकृत्व स्पर्धेत सोळा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



