ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जिव्हाळा तर्फे महात्मा गांधींना अभिवादन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ येथील एकोरी वार्डातील जिव्हाळा मित्र मंडळातर्फे महात्मा गांधी जयंती निमित्त महानगरपालिकेजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जिव्हाळा मित्र मंडळाचे मुख्य संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते अॅड विनोद बोरसे तसेच मंडळाचे जेष्ठ सदस्य रामदास चन्नुरवार यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

उपस्थितांनी देखील महात्मा गांधी यांना अभिवादन केले.यावेळी मंडळाचे सदस्य अविनाश टेकुलवार, संजय आसुटकर, सुरेश चांदेकर,बेरड गुरुजी,गोपशेट्टीवार दादा यांची उपस्थिती होती.



