ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गांधी जयंतीनिमित्त भद्रावतीत राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

   राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भद्रावतीत राष्ट्रपिता नगरविकास मंच आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रपिता नगरविकास मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात माजी शिक्षण अधिकारी काशीनाथ एस. मनगटे यांनी महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित भजन, प्रार्थना, प्रतिज्ञा, रामधुन तसेच विविध गीतांचे भावपूर्ण सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणातून गांधीजींचा सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि शांततेचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचला.

यावेळी माजी आमदार बाळासाहेब ऊर्फ जनार्धन साळुंखे गुरुजी, धनंजय गुंडावार, धर्मेंद्र हवेलीकर, प्रकाश दास, विजय भोयर, रवी पवार यांच्यासह मंचचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

तसेच भद्रावती शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष भूपेश कायरकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सूरज गावंडे, अमोल दौलतकर, सुनील पतरंगे, संदीप चटपकर, दिलीप मांढरे, आशिष देहारकर, अनिल पडोळे, छोटू पारोधे, संजय दुधे, मांडवकर सर तसेच नगरसेविका कल्पना भुसारी, उषाताई जाधव यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांचे स्मरण करून त्यांचा संदेश आचरणात आणण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये