ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दहा दिवसाचा अभ्यास दौरा उत्साहात संपन्न

विविध भागातील दौऱ्या मुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासवृत्ती बुद्धिमत्तेत वाढ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

       डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील तृतीय वर्षातील पाचव्या सत्राच्या विद्यार्थ्यांचा 10 दिवसीय शैक्षणिक अभ्यास दौरा 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान केरळ येथे संस्थेचे अध्यक्ष श्रीमती नंदाताई कायंदे, सचिव सतीश कायंदे यांच्या मार्गदर्शनाला अनुसरून सहल प्रमुख प्रा. मोहजितसिंह राजपूत, प्रा. सोनाली इंगळे, श्रीहरी काळुसे यांच्या समन्वयातून 86 विद्यार्थी व विद्यार्थिनी सह यशस्वीपणे पूर्ण झाला.

       विद्यार्थ्यांनी केंद्रीय समुद्री मत्स्यकी अनुसंधान संस्थान कोची येथे भारतातील सागरी माशांचे उत्पादन आणि सागरी संसाधनांचे मूल्यांकनाच्या शास्त्रीय पद्धतीची

तसेच सागरी संशोधन आणि सागरी हवामानाबद्दल च्या विविध संशोधनाबद्दलची माहिती घेतली,

 सोबतच विद्यार्थ्यांनी सागरी किनारा व तिथे असलेल्या जैवविविधता प्रत्यक्ष बघून अनुभवल्या.

यानंतर विद्यार्थ्यांनी चहा शेती कशी केली जाते या संदर्भात चहाचे मळे व चहा फॅक्टरी यांना भेटी देऊन चहा करण्याच्या पद्धती बद्दल माहिती घेतली.

सोबतच परिसरातील स्पायसेस गार्डन त्यामध्ये लवंग विलायची अशा विविध मसाला पीक यांची माहिती घेत अननसाची व रबर शेती, नारळ शेती अशा नाविन्यपूर्ण शेतीच्या मशागतींबद्दल माहिती घेत केरळ येथील निसर्गाचा भरपूर आस्वाद घेतला.

 यावेळी त्रिवेंद्रम येथील पद्मनाभन स्वामी टेंपल येथे भक्तीपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी दर्शन घेत कन्याकुमारी येथील भारतभूमीचा शेवट देखील अनुभवत स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट दिली.

    या शैक्षणिक अभ्यास दौऱ्या करिता समर्थक कृषी महाविद्यालयाचे संचालक आमदार मनोज कायंदे यांच्या शुभेच्छा व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन मेहेत्रे,उपप्राचार्य प्रा.देवानंद नागरे, प्रा.विलास सातपुते यांचा समन्वय तसेच सहल प्रमुख प्रा.मोहजितसिंह राजपूत यांचे मार्गदर्शन व श्रीहरी काळुसे प्रा.सोनाली इंगळे तसेच सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनींची जिज्ञासा आणि अभ्यासवृत्ती व शिस्त यामुळे हा शैक्षणिक अभ्यास दौरा यशस्वीरित्या संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये