ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’

अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कोरपना तालुक्यात विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

विधान परिषद आमदार चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार आणि राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या नेतृत्वात लखमापूर, निमणी, भोयेगाव, गाडेगाव, विरूर, सांगोडा तसेच गडचांदूर शहरातील अंगणवाडी केंद्रांना भेटी देण्यात आल्या. यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा गौरव करण्याबरोबरच गरोदर व स्तनदा मातांना पोषण आहार, आरोग्य तपासणी व शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले.

अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी कोरोना काळातही बालक, माता आणि कुटुंबांपर्यंत पोहोचून सेवा बजावली, याची दखल घेत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, योग-ध्यान, प्लास्टिकमुक्ती, महिला आरोग्य, व्यसनमुक्ती, पोषण व अॅनिमिया जनजागृती, जलसंवर्धन, कचरा वर्गीकरण, सायबर सुरक्षा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता अशा विविध उपक्रमांवरही भर देण्यात येत आहे.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संजय मुसळे, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा स्मिता चिताडे, महामंत्री सतीश उपलेंचवर पुरुषोत्तम भोंगळे, अरुण रागीट, मोरेश्वर आस्वले, अतुल धोटे, निखिल भोंगळे, अशोक झाडे,रवि बंडीवार यांच्यासह सरपंच संजना बोंडे, सरपंच तेजस्विनी झाडे,आणि तालुक्यातील महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये