ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन दहेगाव गोसावी हद्दीत अवैधरित्या चोरीच्या रेतीची वाहतुक करणारा अटकेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन दहेगाव गोसावी ह‌द्दीत दिनांक 01/10/2026 रोजी मध्यरात्री दरम्यान खाजगी चारचाकी वाहणाने मा. पो.नि. यशवंत कदम ठाणेदार पो.स्टे. दहेगाव गोसावी यांचे सह त्यांचे पथक हे पोलीस स्टेशन दहेगाव गोसावी परिसरात अवैद्य वाळु चोरी सबंधाने कार्यवाही करीता गस्तीवर असतांणा पोलीस कर्मचारी यांना मुखबिर व्दारे माहीती मिळाली की, एक लाल रंगाचा ट्रॅक्टर व हिरव्या रंगाची ट्रॉली मध्ये देउळगाव शिवनगर गावात राहणारे शाम नैताम व समीर वैद्य हे दोघेही मिळुन ट्रॉलीमध्ये अवैध रित्या चोरीची काळी रेती भरून काही वेळात हमदापुर गावाकडे येणार आहे. अश्या माहीती वरून देरडा चौक हमदापुर येथे नाकेबंदी करून छापा टाकला असता आरोपी टॅक्टर चालक नामे शाम भारगुजी नैताम रा. देउळगाव (शिवनगर) हा मौक्यावरून पसार झाला. मौक्यावर टॅक्टर मालक आरोपी नामे समीर विलास वैद्य वय 25 वर्षे रा. देउळगाव (शिवनगर) ता. सेलु जि. वर्धा हा मिळुन आल्याने त्याचे ताब्यातुन 1) एक लाल रंगाचा massey ferguson कंपनिचा ट्रॅक्टर क्र.एच.एच. 32 ए.एक्स 3363 किंमत 5,00,000 रू (पाच लाख रूपये) 2) एक हिरव्या रंगाची RAJ कंपनिची ट्रॉली क्रमांक एम.एच. 32/पी/2410 किंमत 1,50,000 रू ( एक लाख पन्नास हजार रूपये) ३) नमुद ट्रॉलीमध्ये अंदाजे 01 ब्रास काळी रेती किंमत 10,000 रू असा एकुण जुमला किंमत 6,60,000 (सहा लाख, साठ हजार रूपये) असा माल मिळुन आल्याने जप्ती पंचनामा कार्यवाही प्रमाणे संपुर्ण माल जप्त करण्यात आलेला आहे. शासन तर्फे लेखी तक्रार वरून अपराध क्र. 0188/2026 कलम 303 (2). 3 (5) भारतिय न्याय संहिता 2023 सहकलम 3 (1), 181 मोटार वाहण कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला सदर गुन्हयांचा तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री सदाशिव वाघमारे सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री सुनिल महाडिक सा. याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे मा. पोलीस निरिक्षक यशवंत कदम ठाणेदार पो.स्टे दहेगाव गो. यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात स.फौ. ब्रम्हानंद मुन, पोलीस हवालदार आनंद भस्में, राधाकिसन घुगे पोलीस अंमलदार कांचन चाफले, अनिल चिलगर, संदेश सोयाम सर्व नेमणुक पो.स्टे. दहेगाव गोसावी यांनी केलेली आहे.

यशवंत एस. कदम) ठाणेदार, पो.स्टे. दहेगाव गो. जि. वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये