ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, जेष्ठ नागरिक संघटना देऊळगाव राजा, तालुका विधी सेवा समिती, व वकील संघ यांच्या वतीने जागतिक जेष्ठ नागरिक दिन आज विरंगुळा भवन येथे साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंदराव अहिरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष बळीराम मापारी, माजी नगराध्यक्षा सरस्वती टेकाळे, छबुराव भावसार, ॲड घनश्याम भाला, अरुण लताड, प्रा विनायक कुळकर्णी, प्रा. अशोक डोईफोडे,प्रा. विजय रायमुल, सागर गुजर, मुके साहेब, दिवाणी व फौजदारी न्यायालय उपस्थित होते.

यावेळी पंडितराव पाथरकर, रमेश नरोडे, प्रकाश अहिरे, गोविंदराव बोरकर, राम चौधरी,अनिल कुळकर्णी, बाबुलाल शिवरकर, अरुण सपाटे, बालाजी गोरे, मारोतराव भालेराव, श्रीकांत कुळकर्णी, शेख कदीर, शेख महमूद, कारभारी सोसे, गणेश देशपांडे, रामदास भोलणकर, व इतर मान्यवर उपस्थित होते, याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जेष्ठ नागरिकांच्या समस्या मांडल्या, त्या प्रशासनाने सोडवाव्या अशी मागणी केली.

याप्रसंगी स्व रामराव दंदाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, यावेळी राजमाता जिजाऊ जेष्ठ नागरिक संघटना बहुउद्देशीय सेवा संघ, देऊळगाव राजा ची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली, कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव गोविंदराव बोरकर यांनी केले, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये