ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरफोडी करणाऱ्या आरोपींताना ताब्यात घेवुन एक सोन्याचे मंगळसुत्र व मोबाईलसह एकूण कि. 2 लाख 9 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

फिर्यादी नामे मनोज रामचंद्र गडवाल, रा. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट यांनी पोलीस स्टेशन, हिंगणघाट येथे दिनांक 23.09.2026 रोजी तक्रार दिली की, फिर्यादी हे घटना तारखेला पहाटे 04.45 वा. सुमारास आपले पत्नीसह मेडीटेशन करणे करीता घराला लॉक लावुन गेले व मेडीटेशन करून सकाळी 06.30 वा घरी परत आले तेव्हा वॉल कंम्पाउडचे गेटचे व घराचे दाराचे कुलुप तुटलेले दिसले तेव्हा त्यांनी आतमध्ये जावुन पाहणी केली असता, घरातील सामान अस्ताव्यस्त पडुन असलेले दिसले, व अलमारीतील सोन्या चांदीचे दागिने, नगदी दोन अँड्रॉइड मोबाईल असा एकुण जुमला किंमत 2,14,500/- रू चा माल चोरीला गेल्या बाबत, फिर्यादी यांनी पोलीस स्टेषन हिंगणघाट येथे दिलेल्या तक्रारी वरून अपराध क्रमांक 1542/2026 कलम 305 (अ), 331(4) भा.न्या.स अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा समातर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत असता, घटनास्थळ परीसरातील सि.सी.टी.व्ही कॅमे-याची पाहणी केली असता, एक ईसम संशयितरित्या फिरत असतांना दिसुन आल्याने सदर ईसमा बाबत मुखबिर कडुन माहिती प्राप्त केली असता, सदर ईसम हा राकेश पाचे, रा. पिपरी मेघे, वर्धा हा असल्याची व त्यानेच हिंगणघाट येथे घरफोडी केल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सदर आरोपीचा शोध घेत असता, सदर आरोपी हा आपले मित्रासह इदगाह मैदान, वर्धा येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर ठीकाणी सापळा रचुन त्यास त्याचे साथीदारासह ताब्यात घेवुन त्यांना त्याचे नाव विचारले असता, त्यांनी त्याचे नाव 1) राकेश बेनीराम पाचे, वय 30 वर्श, रा. पिपरी मेघे, वर्धा, 2) आकाश रमेश देवतळे, वय 34 वर्श, रा. तारफैल, वर्धा असे सांगीतले वरून राकेश पाचे यास गुन्हया संबंधाने सखोल विचारपुस केली असता, त्याने सदरचा गुन्हया त्याचे सोबत असलेला मित्र नामे आकाष देवतळे याचे सोबत केल्याचे कबुल केले वरून दोन्ही आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याचे ताव्यातुन एक पदक असलेली पिवळया काळया मन्यात गुफलेली मंगळसूत्र अंदाजे वजन 15 ग्राम किमत 2,04,000/- रू ची व एका ओपो कंम्पनीचा निळया रंगाचा अँड्रॉइड मोबाईल फोन अंदाजे किंमत 5,000/- रू चा असा एकुण जुमला किंमत 2,09,000/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर दोन्ही आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन, हिंगणघाट याचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक, श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनी राहुल इंटेकार, पोलीस अंमलदार सचिन इंगोले, भुशन निघोट, विक्रम काळमेघ, धर्मेंद्र अकाली, अमोल नगराळे, मंगेश चावरे, अरविंद इंगोले, राहुल अघवाल, जगदीश डफ, दिनेश बोथकर, रितेश गेटमे सर्व नेमणुक स्थाानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये