मोक्काअंतर्गत फरार दोन आरोपींना ठोकल्या बेड्या
सहायक पोलीस निरीक्षक अमोल जाधव यांनी केलेली चांगली कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : मोक्का गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अटक करण्यात मोक्का तपास पथक व डी.बी. पथकाला मोठे यश आले आहे. पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून भूषण संतोष राऊत आणि जतीन सतीश राऊत या दोन्ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहूनं ताब्यात घेतले.
पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का कलमान्वये वाढ करण्यात आली होती. गुन्हा नोंद झाल्यापासून दोन्ही आरोपी फरार होते. पोलिसांचे पथक त्यांच्या शोधात असतानाच, आरोपी भूषण संतोष राऊत (रा. सोमनाथे ले आऊट, सिंदी मेघे) हा त्याच्या राहत्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरावर पाळत ठेवून त्याला राहत्या घरातून ताब्यात घेतले. तर दुसरा आरोपी जतीन सतीश राऊत रा.इंदिरानगर हा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला वर्धा बसस्टॉप येथून ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींना नमूद गुन्ह्यात रीतसर अटक करण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, वर्धा अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल आत्राम यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांच्या निर्देशात मोक्का तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल जाधव, पोलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड, राधेश्याम टेंभरे, प्रशांत वंजारी, नरेंद्र कांबळे, अनिल चव्हाण, वैभव जाधव, श्रावण पवार, पांडुरंग फुगनर यांनी केलेली आहे.



