वर्धा जिल्हा पोलीस दलातील ५ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ संपन्न!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हा पोलीस दलातील खालील पोलीस अधिकारी व अंमलदार हे आपल्या नियत वयोमानानुसार दिनांक 30 सप्टेंबर २०२६ रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेचा गौरव करण्यासाठी आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी ०६.०० वाजता, पोलीस अधीक्षक कार्यालय येथील ‘क्राईम मिटिंग हॉल’ मध्ये एक भव्य निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
मा. अपर पोलिस अधीक्षक वर्धा श्री. सदाशिव वाघमारे यांच्या उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमाला पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, विविध शाखांचे प्रमुख आणि मंत्रालयीन कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व अंमलदारांची नावेः
१) पोउपनि सलाम कादर कुरेशी (स्था.गु.शा.)
२) ग्रेड पोउपनि दिनेश रामजी हजबे (पोलिस मुख्यालय वर्धा)
३) ग्रेड पोउपनि रवींद्र बी डहाके (जी, वि, शा)
४) ग्रेड पोउपनि सुधाकर के बावणे (पोलिस मुख्यालय वर्धा)
५) मपोहवा/ शालिनी राजू डोंगरे (चव्हाण) (पो. स्टे देवळी)
समारंभादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी पोलीस दलात बजावलेल्या प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ सेवेबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले, तसेच त्यांच्या पुढील सुखी, समृद्ध आणि आरोग्यदायी भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व अधीनस्थ सर्व अधिकारी, अंमलदार आणि मंत्रालयीन स्टाफ बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. निवृत्त कर्मचारी यांचे परिवारातील व्यक्तीही या निरोप समारंभाला हजर होते.
(आशिष चिलांगे) सहायक जनसंपर्क अधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालय वर्धा,



