ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
फिरताना आढळलेल्या महिलेला माहेर आश्रमात दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : शहरातील गौरक्षण वॉर्ड परिसरात एक महिला फिरताना आढळून आली. तिची माहिती घेऊन संबंधितांनी तिला सुरक्षिततेच्या दृष्टीने माहेर आश्रम, सालोड येथे दाखल केले.
महिला आढळून आल्यानंतर तिच्याशी संवाद साधून तिच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली. त्यानंतर तिला माहेर आश्रमात सुरक्षितपणे दाखल करण्यात आले. यावेळी संबंधित महिला व आश्रमातील पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती होती.
महिलेची ओळख पटविण्यासाठी व तिच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.



