ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरीचे नवे ठाणेदार — “सिंघम”बाज हेमंत पवार!

धडक कारवाईच्या लौकिकामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींचे धाबे दणाणले; अवैध धंद्यांवर कारवाईची अपेक्षा.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

 गोंडपिपरी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी हेमंत पवार यांची नियुक्ती झाल्याने परिसरातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. यापूर्वीच्या कारकीर्दीत केलेल्या धडक कारवायांमुळे पवार यांनी कर्तव्यदक्ष आणि कठोर अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच कार्यपद्धतीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये धाक निर्माण झाल्याची चर्चा असून, आता गोंडपिपरीतही त्याच धडाडीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

गोंडपिपरी पोलीस ठाण्यात यापूर्वी कार्यरत असलेले ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या कार्यकाळानंतर आता हेमंत पवार यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकून त्यावर कायदेशीर पद्धतीने तत्काळ कार्यवाही करणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि पोलिसांचा जनतेशी समन्वय वाढविणे, याला त्यांच्या कार्यकाळात प्राधान्य मिळण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, नागरिकांच्या तक्रारींना वेळेत प्रतिसाद, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य, गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई आणि पोलीस _ नागरिकांमधील विश्वास वाढविणे, या बाबींवर पवार यांच्या कार्यकाळात विशेष भर राहण्याची अपेक्षा आहे.

आता गोंडपिपरीतील अवैद्य धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर नव्या ठाणेदारांचा “पवार पॅटर्न” कितपत प्रभावी ठरतो, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

*अवैध धंद्यांवर कारवाईचे मोठे आव्हान*

गोंडपिपरी परिसरात वाढत असल्याची चर्चा असलेल्या अवैध दारू, जुगार, सट्टा, गुटखा विक्रीसह अन्य बेकायदेशीर प्रकारांवर पोलिसांकडून प्रभावी कारवाई होण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर नव्या ठाणेदारांच्या धडक कार्यपद्धतीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अवैध धंद्यांशी संबंधित संशयित व्यक्तींनीही नव्या ठाणेदारांच्या नियुक्तीची दखल घेतल्याची चर्चा परिसरात आहे. यापूर्वीच्या सेवाकाळात पवार यांनी केलेल्या कारवायांचा लौकिक लक्षात घेता, गोंडपिपरीतही कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

*“सिंघम”बाज कार्यपद्धतीची अपेक्षा*

गोंडपिपरीसारख्या ग्रामीण भागात कायदा-सुव्यवस्था राखताना पोलिसांसमोर अनेक आव्हाने आहेत. गावागावातील किरकोळ वाद, अवैध धंदे, वाहतूक नियमांचे उल्लंघन तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची प्रभावी उपस्थिती आवश्यक आहे. त्यामुळे नव्या ठाणेदारांकडून “सिंघम”बाज धडक कार्यपद्धतीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये