ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत गोंडपिपरीत विशेष स्वच्छता मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत नगरपंचायत गोंडपिपरीच्या वतीने बुधवार, ३० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगरपंचायत परिसरात आयोजित या मोहिमेत अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रत्यक्ष स्वच्छता केली.

नगराध्यक्षा अश्विनी तोडासे आणि मुख्याधिकारी विवेक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेद्वारे स्वच्छ, सुंदर व निरोगी गोंडपिपरीचा संदेश देण्यात आला. सहभागी कर्मचाऱ्यांनी परिसरातील कचरा साफ करून स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली.

यावेळी प्रशिक बनसोड, स्वच्छता विभाग प्रमुख उमेश शेंडे, शहर समन्वयक नागेश सदावर्ते, लेखापाल प्रकाश पंचाले, नगरसेवक शारदा गरपल्लीवार, राकेश पुण, अनिल झाडे, बबन निकोडे, वनिता देवगडे तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. आदेश मेश्राम, आनंद वनकर, नितीन झाडे, सुनील नवघडे, संजय सोयम, मेघराज मुंडे, नगररचनाकार अमोल कुडमेठे, अग्निशामक चालक आदींनीही सहभाग नोंदविला.

“स्वच्छता ही सेवा_स्वच्छता हीच जबाबदारी!” या संदेशातून मोहिमेचा समारोप करण्यात आला.

“स्वच्छ गोंडपिपरी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. स्वच्छता ही सामुदायिक जबाबदारी असून सर्व नगरवासीयांनी स्वच्छ नगरासाठी पुढाकार घ्यावा,” असे मुख्याधिकारी विवेक चौधरी यांनी सांगितले. तर “स्वच्छ गोंडपिपरी हे आमचे स्वप्न आहे. यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांनीही स्वच्छतेच्या कार्यात सहभागी व्हावे,” असे नगराध्यक्षा अश्विनी तोडासे यांनी आवाहन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये