ब्रम्हपुरी अर्बन को ऑप बँकेची 30 वी वार्षीक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी येथील ब्रम्हपुरी अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक लि. ची ३० वी वार्षीक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता विठ्ठल रुख्मीनी सभागृह, ब्रम्हपुरी येथे अतुल देशकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सर्व संचालकांनी दिप प्रज्वलन व भारतमाता पूजन करुन अहवाल वर्षात दिवंगत शेतकरी बांधव, सैनिक, सभासद खातेदार, हितचिंतक तसेच बँकेचे जेष्ठ संचालक डॉ. विलासजी गजपूरे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश दुब्बावार यांनी सभेचे कामकाज सांभळले. विषयावर चर्चा होऊन ठराव सर्व संमतीने मंजूर करण्यात आले. अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सभासदांच्या प्रश्नांचे समर्पक असे उत्तर देऊन यांनी सभासदांची मने जिंकली.आमसभेला अध्यक्ष अतुल देशकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतात बँकेच्या उत्तरोत्तर होणाऱ्या उन्नती बद्दल संचालक मंडळ, सभासद व ग्राहक तसेच सर्व कर्मचारी वर्गाचे अभिनंद केले.
बँकेच्या उत्तरोत्तर होणान्या प्रगती बाबत प्रयत्नशील राहू अशी मनोकामना व्यक्त केली.आमसभेचे आभार उपाध्यक्ष रविंद्र आष्टेकर यांनी मानले आणि अशा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बँकेची ३०वी आमसभा संपन्न झाली.



