ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैद्य मुरूम उत्खनन करणाऱ्यांवर ब्रह्मपुरी वन विभागाची मोठी कार्यवाही

१० ट्रॅक्टर व १ जेसीबी जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी, देलनवाडी आणि खेडमक्ता परिसराला लागून असलेल्या गट क्रमांक १३९ च्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननावर वन विभागाने आज, १ ऑक्टोबर रोजी धडक कारवाई केली. या धाडीत अवैधपणे मुरूम उपसा व वाहतूक करणारे तब्बल १० ट्रॅक्टर आणि १ जेसीबी मशीन रंगेहात पकडण्यात आली आहे. वन विभागाच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे परिसरातील वाळू व मुरूम माफियांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गट क्रमांक १३९ मधील वन जमिनीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी अचानक छापा टाकला. त्यावेळी तेथे जेसीबीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मुरूम उपसला जात होता आणि ट्रॅक्टरमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावली जात होती. वन विभागाने तातडीने चक्र फिरवत घटनास्थळावरून १० ट्रॅक्टर आणि उत्खनन करणारी १ जेसीबी जप्त केली. ही सर्व वाहने ताब्यात घेण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

सदर धडक कारवाई वन विभाग (उत्तर) चे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप आर. कन्नमवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक मैफूज अली सय्यद, वनरक्षक पंकज चुन्ने, रेखचंद तोंडरे, दिलीप लाडे, सचिन शेंडे या वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. शासनाच्या आणि वन जमिनीच्या मालमत्तेवर डाका घालणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा वन विभागातर्फे देण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये