“रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा पोलीस अधीक्षक मा.श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणा-या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाने अवैध व्यवसाय करणा-या गुन्हेगारांवर कार्यवाही करण्याची धडक मोहिम राबविली असुन, सदर मोहिमेदरम्यान दिनांक 23 सप्टेंबर 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा येथील पथकास मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन हिंगणघाट मौजा ‘बोरखेडी रेती घाट वणा नदी पात्राचे बोरखेडी रेती घाट रस्त्यावर दोन महिंद्रा 575 डी आय कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर इंजिन क्रं NKJW03354 व महिंद्रा 575 डी आय कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर इंजिन क्रं NKJW03354 वर सापळा रचुन कार्यवाही केली असता, आरोपी हे रेतीची अवैध त्यांचे स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या बोरखेडी शिवारातील वणा नदी पात्राचे घाटातुन रेतीची चोरी करून, विना परवाना रेतीची वाहतुक करतांना मिळुन आल्याने, जागीचं आरोपीतांचे ताब्यातुन ट्रॅक्टर ट्रॉलीसह 20 ब्रास रेती जु.किं. 12,20,000 रू. चा मुद्देमाल जप्त करून, 1. चालकमालक आकाश बिंदुसागर बानमारे रा. भिमनगर वार्ड हिंगणघाट, चालक किशोर दत्तुजी कुडमते रा. पिंपळगांव ता. हिंगणघाट 3. मालक कुणाल मोरेश्वर येसंबरे रा. भिमनगर वार्ड हिंगणघाट, अशा एकुण 03 आरोपीतांविरूध्द पो.स्टे. हिंगणघाट येथे रेती चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पोहवा. नरेंद्र पाराशर, रामेश्वर नागरे, पोअं. मिथुन जिचकार, प्रफुल पुनवटकर सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.



