अवघ्या चार तासात उघडकीस आणला जबरी चोरीचा गुन्हा
पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील डीबी पथकाची कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 20.09.2026 रोजी रात्री 20.00 ते 20.30 वा. चे सुमारास फिर्यादी आपले मित्रासह मोपेड गाडीने पोस्टऑफीस चौक ते गांधी पुतळा जाणाऱ्या रोडने जात असतांना मागावुन मोपेड गाडीने आलेल्या दोन अनोळखी मुलांनी त्यांची गाडीला गाडी आडवी करून त्यांना अडविले व शिवीगाळ केली. त्यामुळे सोबत असलेल्या मित्राला पोलीसला फोन करण्यास सांगीतले असता तेथे आधिच एका दुसऱ्या मोपेड गाडीवर बसुन थांबुन असलेल्या दोन अनोळखी मुलांनी फिर्यादीचे मित्राला मारहान करण्यास सुरूवात केल्याने फिर्यादी हे सोडविण्याकरीता मध्ये गेले असता त्या चारही ईसमांनी फिर्यादी व त्याचे मित्राला पहीले हाताबुक्क्यांनी व नंतर त्यापैकी एकाने धारधार शस्त्राने फिर्यादीचे डावे कानाखाली व डावे गालावर मारून जख्मी केले तसेच फिर्यादीचे हातातील बोटात असलेली 05 ग्रॅम वजनाची सोन्याची गोल अंगठी ज्यामध्ये पन्ना खडा असलेली कि. 45000 रू ची जबरीने ओढुन हिसकावुन घेवुन गेले. तसेच मित्राला सुद्धा कोणत्यातरी धारधार शस्त्राने मारले आहे. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट व वैद्यकीय अधिकारी यांचे इन्ज्युरी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील पोलीस निरीक्षक श्री नागेशकुमार चतरकर यांनी गुन्हयाचे गार्भीय लक्षात घेवुन लागलीच गुन्हे प्रगटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड यांना तपासाच्या सुचना देवुन त्यांनी ताबडतोब तपासकामास सुरूवात केली व प्राप्त माहीती व उपलब्ध पुराव्यावरून गुन्हा करणाऱ्या चारही अनोळखी ईसमांचा शोध घेवुन ते चारही विधीसंघर्षीत बालक असल्याचे लक्षात आल्याने बाल न्याय अधिनीयमातील तरतुदीप्रमाणे विधीसंघर्षीत बालकांचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेले धारधार शस्त्र (चाकु), तसेच गुन्हयात वापरलेल्या दोन्ही मोपेड गाड्या जप्त करून विधी संघर्षीत बालकांची बाल सुधार गृहात रवानगी केली.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सा श्री सौरभकुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधिक्षक सा. श्री सदाशिव वाघमारे, मा. उविपोअ सा. श्री सुनिल महाडिक, मा. पो.नि.श्री नागेशकुमार चतरकर सा.यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी पो.उप.नि. शरद गायकवाड, डि.वी. पोलीस अंमलदार गजेंद्र धर्मे, नितीन ईटकरे, प्रशांत वंजारी, अभिजीत वाघमारे, नरेंद्र कांबळे, श्रावण पवार, रंजीत भुरसे, अमोल साळवन यांनी केली आहे.



