ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकातर्फे सेलू येथे हातभटटीवर धडक कारवाई.”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा पोलीस अधीक्षक मा.श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील अवैध दारू वाहतूक, निर्मीती व विक्री करणा-या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाने गावठी दारू निर्मीती करणाऱ्या गुन्हेगारांवर दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस स्टेशन सेलु हद्दीतील मौजा सेलु वडगाव शेत शिवारात बोर नदीचे जवळ गावठी दारू निर्मीती करण्याच्या ठिकाणांचा शोध घेवुन मोठ्या प्रमाणात मोहा सडवा रसायण मुद्देमाल नाश करण्यात आला. अंदाजे 2470 ली. मोहा सडवा रसायण, इतर भट्टी साहित्यसह जु.कि. 4,14,500/- रू चा मुद्देमाल जप्त करून, जागीच नाश करण्यात आला असुन, गावठी मोहा दारूची निर्मीती करणारे गुन्हेगार नामे 1) कुणाल ऊर्फ केशव पचारे, 2) धर्मराज पचारे दोन्ही रा. वार्ड क्रमांक 4 सेलू ता सेलू जि वर्धा यांचेविरूध्द पोलीस स्टेशन सेलू येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पोहवा. नरेंद्र पाराशर, रामेश्वर नागरे, पोअं. मिथुन जिचकार, प्रफुल पुनवटकर सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये