ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतातील विहिरीत पडून दोन बहिणींचा दुर्देवी मृत्यू

कोलगाव शिवारातील घटना, सेलू परिसरात हळहळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेलू परिसरातील कोलगाव शिवारात शेतातील विहिरीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. बुधवारी (ता. २३) दुपारच्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण सेलू परिसरात आणि कोलगाव गावावर तीव्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

शहरातील गुड शेफर्ड आणि स्कुल ऑफ ब्रिलीयंट मध्ये शिकणाऱ्या आपल्या दोन मुलींना पालकाने मध्येच शाळेतून बाहेर गावी जाण्याचे बहाण्याने घेऊन जात कोलगाव शिवारातील शेतात नेले असता तिथे दोघीचा विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना बुद्धवारी दुपारी उघडकीस आली सेलूतील धान्य मार्केटसमोर राहणाऱ्या साटोने कुटुंबावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. ब्रिलियंट स्कूलमध्ये शिक्षण घेणारी दिव्या सचिन साटोने वय (८) तसेच उन्नती सचिन साटोने वय (१०) या दोन चिमुकल्या बहिणीना पालक सचिन यांनी शाळेतून बाहेर गावी जाण्याचे बहाण्याने सुटी मागीतली त्यानंतर दोषींना घेऊन ते कोलगाव शिवारातील शेतात गेले होते काही वेळातच त्या विहिरित पडल्याचे दिसून आले. पाणी पिण्यासाठी गेल्या असता पाय घसरून पडल्याचे सांगितले जात असले तरी यामागे काही वेगळेच कारण असल्याचे निदर्शनास येत आहे या दोघी विहीरात पडल्याचे दिसून येताच पालकाने विहीरीत उडी घेऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असेही बोलले जात आहे या घटनेनंतर शिवारातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत घेतली या घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे सह ठाणेदार पंकज वाघोडे, प्रशांत श्रीवास्तव, राकेश देवगडे, मंगेश राऊत, नितीन डाखोळे यांनी घटनास्थळी दाखल होत नागरीकांच्या मदतीने दोषीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

या घटनेने संपूर्ण सेलू परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सचिन साटोने यांना तिन मुली असून मोठी मुलगी देवयानी ही स्कुल ऑफ ब्रिलीयंट ला सहाव्या वर्गात आहे ती गावातच गणपती कार्यक्रमात जेवण करण्यासाठी गेली होती त्यामुळे ती पालकाला मिळाली असे सांगितले जाते. दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून सेलू ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.

या घटनेची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सेलू पोलीस करीत आहे घटनेची नेमकी परिस्थिती आणि इतर तपशील पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे सेलू परिसरात शोककळा पसरली आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये