ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन योग स्पर्धा उत्साहात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर : महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी आंतरमहाविद्यालयीन योग टूर्नामेंटचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव होते. स्पर्धेचे आयोजन डॉ. अनिस खान, संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांनी केले.

यावेळी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून डॉ. संतोषकुमार शर्मा (G.N. College, बल्लारशाह), डॉ. महेश जोशी (हार्डे महाविद्यालय, चामोर्शी), डॉ. महेश शर्मा (चिंतामणी महाविद्यालय, पोंभुर्णा) तसेच डॉ. देऊळकर (लोकमान्य महाविद्यालय, वरोरा) उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. अनिस खान यांनी केली. त्यांनी योगाचे शारीरिक, मानसिक तसेच व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, योग स्पर्धेचे महत्त्व विशद करणे आणि आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. मनोहर बांद्रे यांनी केले.

उद्घाटनानंतर योग स्पर्धेच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. विविध महाविद्यालयांतून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध योगासनांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे विविध निकषांच्या आधारे बारकाईने परीक्षण केले. त्यानंतर स्पर्धेतील गुणवत्तेनुसार प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निश्चित करण्यात आले.

या स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, शिस्त आणि एकाग्रता वाढविण्यासाठी अशा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये