ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. प्रकाशराव शेंडे प्राचार्य पदी रुजू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 गुरुकुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे सरदार पटेल महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शेंडे यांची प्राचार्य पदावर नियुक्ती झाली व ते प्राचार्य म्हणून महाविद्यालयामध्ये रुजू झाले.

          याप्रसंगी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुनिता विरेंद्र लोढिया,संस्थेचे सचिव डॉ. अनिल मुसळे, यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

       सदर कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी श्री. प्रेमनाथजी पानघाटे,श्री. मनोहरराव झाडे, श्री. किसनराव गोंडे, डॉ. राजेश डोंगरे,डॉ. प्रशांत पुराणिक प्रा. सचिन कर्णेवार प्रा.आशिष पईनकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे यांनी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची नवनियुक्त प्राचार्य यांना ओळख करून दिली.

       हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुशांत खिरटकर, प्रफुल मुसळे, संतोष चौधरी,प्रशांत नवले, सविन मडावी,शालिक कांबळे, सविता बुरान यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये