शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे तहसीलदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.
सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात, शेतमजूर व कामगारांना रोजगार हमी योजनेअंतर्गत पुरेशा प्रमाणात कामे उपलब्ध करून देण्यात यावीत, तसेच वीज बिलासह इतर सर्व प्रकारच्या सक्तीच्या वसुलीला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
याशिवाय शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तात्काळ करण्यात यावी, कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच २५ जून २०२५ पूर्वीची पीक विमा योजना लागू करण्यात यावी, अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख दादाराव खार्डे, माजी नगराध्यक्ष गोविंदराव झोरे, शहरप्रमुख अजय शिवरकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख नितेश देशमुख, उपशहरप्रमुख मोहन खांडेभराड, योगेश मिसाळ, किशोर खेडेकर, विशाल उखळकर, अमर उडाणशिव, मंगेश इंगळे, नागेश पऱ्हाड, विजय जमधडे, राजीव नागरे, गिरीश वाघमारे, सौरभ इंगळे, गजानन घुगे, राजू पवार, अविनाश डोईफोडे, विठोबा पवार, सदाशिव मुख्यादल गजानन मोरे सोसे सर यांच्यासह अनेक शिवसैनिकांच्या सह्या आहेत.
शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



