ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दामीनी पथक पोलीस अधिक्षक कार्यालय, वर्धा जिल्हाची महत्वपुर्ण लोकाभीमुख कामगीरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक १०/०९२२०२६ रोजी मा. जिल्हाधिकारी वान्मथी सी, पोलीस अधिक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे अन्य मान्यवंराचे उपस्थितीत दामिनी पथकाचे दुचाकी वाहनांचा हस्तांतरण सोहळा पार पाडला असुन नमुद वाहने सर्व पोलीस स्टेशनला वितरीत करण्यात आले असुन पोलीस स्टेशन स्तारावरील तसेच पोलीस अधिक्षक कार्यालय येथील दामिनी पथकातील महिला अंमलदार हया गर्दीचे ठिकाणी, वस्तीगृह, बाजारपेठ, बसस्टॅन्ड, शाळा-महाविद्यालयाचे बाहेरील परिसर बगीचे उदयान निर्जनस्थळे येथे सतत गस्त करीत असुन सध्या सुरु असलेल्या गणेत्शोत्सवा दरम्यान सर्व गणेश मंडळाना भेटी देवुन तेथे जनजागृती संदर्भातील पॉम्पलेटचे वाटप पेट्रोलीग दरम्यान करण्यात येत असुन व्हॉटसअॅप हेल्पलाईन बाबत माहिती देण्यात येत आहे.

विविध शाळा, कॉलेज व वस्तीगृहे येथे भेटी देवुन तेथील महिला व मुलींना मुलांना सायबर अवेअरनेस, गुड टच, बॅड टच, वाहतुकीचे नियम, व्यसनाचे दुष्परीणाम, मानवी तस्करी विविध विषयांवर मार्गदर्शन करुन जनजागृती जनजागृती करण्यात येते.

मा. जिल्हाधिकारी वर्धा, मा. पोलीस अधीक्षक वर्धा, मा. अपर पोलीस अधीक्षक यांचे हस्ते “दामिनी” व्हॉटसअप हेल्पलाईन क्रमाक ७६२०५२००२५ चे उद्घाटनसोहळा झाला असून वर्धा जिल्हयातील सर्व शालेय व महाविद्यालयातील विदयार्थीनी “दामिनी” व्हॉटसअप हेल्पलाईन क्रमाक ७६२०५२००२५ चा संकटाचे वेळी उपयोग करावा तसेच विदयार्थीना कुठे सुरक्षित न वाटल्यास हेल्पलाईन वर एक व्हॉटसअॅप मेसेज करुन सविस्तर माहिती दयावी जेणेकरुन आपणास मदत करता येईल असे आवाहन आम्ही सपोनि माधुरी वाघाडे भरोसा सेल / दामिनी पथक प्रमुख व्दारे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये