ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैधरित्या दारु विक्री करणारी टोळी दिड वर्षा करिता वर्धा जिल्हयातून तडीपार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यात अवैधरित्या सुरु असलेल्या दारुवे समुळ उच्चाटन करण्यासाठी आणि आगामी काळातील सन उत्सव दरम्यान नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी पोलीस स्टेशन सेतू हद्दीतील सराईत दारु विक्रेत्यांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन सेलू जि. वर्धा हद्दीतील दोन सराईत दारु विक्रेते गुन्हेगार क्र. 1) बॉबी संजय खोडे रा. विकास चौक सेलू, क्र. 02) धिरज सदाशिव ओंकार रा. कोथीवाडा, ता. सेलू, जि. वर्धा यांवेवर वेळोवेळी छापे टाकून दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करुन सुध्दा ते अवैधरित्या दारु विक्री सुरुच ठेवत असल्याने तसेव त्यांचे वर्तवणूकीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने त्यांना मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधिक्षक साहेब वर्धा यांचे दिनांक 22/09/2026 रोजी च्या आदेशान्वये 01 वर्ष 06 महिने करिता वर्धा जिल्ह्यातुन तडीपार (हहपार) करण्यात आले आहे.

सदस्वी कारवाई श्री. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधिक्षक सा. वर्धा, श्री. सदाशिव वाघामारे अपर पोलीस अधिक्षक सा. वर्धा, श्री. सुनिल महाडिक उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. विनोद चौधरी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाख्वा वर्धा यांचे मार्गदर्शनात श्री. पंकज वाघोडे सपोनि ठाणेदार पो.स्टे. सेतू, पोलीस अमंलदार दिनेश करतुके स्था. गु.शा. वर्धा, ज्ञानदेव वनवे पो.स्टे. सेलू यांनी केली.

(पंकज वाघोडे) सपोनि. ठाणेदार पो.स्टे. सेलू जि. वर्ध

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये