पोलीस स्टेशन, वर्धा (शहर), रामनगर हद्दीत वारंवार गुन्हे करणारा कुख्यात गुंड त्याचे साथीदारांविरुध्द मोक्का अन्वये कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन, वर्धा (शहर), रामनगर जि. वर्धा हद्दीतील इंदिरानगर, आदीवासी कॉलनी, वर्धा ता. जि. वर्धा परीसरातील कुख्यात गुंड टोळी प्रमुख नामे १) सुरज ऊर्फ टोली मनोज धाडवे, वय २७ वर्ष, राह. इंदिरानगर, आदीवासी कॉलनी, वर्धा ता. जि. वर्धा व त्याचे सोबत गुन्हे करणारे त्याचे साथीदार नामे २) भुषन संतोषराव राऊत, वय २१ वर्ष राह. वर्धा ३) शंतनु आदेश नेवारे, राह. सोमनाते लेआऊट रामनगर, वर्धा ४) गौरव संजयराव जबडे, वय २४ वर्ष राह. इंदिरानगर, आदीवासी कॉलनी, वर्धा जि. वर्धा ५) जतिन सतिश राऊत, वय १९ वर्ष इंदिरानगर, आदीवासी कॉलनी, वर्धा जि. वर्धा ६) अनोळखी इसम यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, वर्धा (शहर), रामनगर जि. वर्धा येथे गैरकायद्याची मंडळी जमवुन दुखापत करुन शिवीगाळ व मारण्याची धमकी देवून व नुकसान करुन खंडणी मागणे, गंभीर दुखापत करणे, साथीदारासह मिळुन खुनाचा प्रयत्न करणे, देशी व विदेशी दारुची वाहतुक करणे, शासणाचे आदेशाचे उल्लंघन करुन शस्त्रासह गैरकायद्याची मंडळी जमवुन शिवीगाळ करुन नुकसान करणे या प्रकारचे गुन्हे करण्याचे सवईचे आहे. सदरचे गुन्हे हे वरील नमुद टोळी प्रमुख व त्याचे साथीदाराने वैयक्तीक व सामाईकरीत्या केलेले आहे. सदरचे गुन्हे हे टोळी प्रमुख व त्याचे साथीदार हे त्यांचे टोळीचे आर्थीक फायद्या करीता व टोळीच्या वर्चस्वाकरीता करीत होते.
कुख्यात गुंड टोळी प्रमुख नामे १) सुरज ऊर्फ टोली मनोज धाडवे, वय २७ वर्ष, राह. इंदिरानगर, आदीवासी कॉलनी, वर्धा ता. जि. वर्धा व त्याचे सोबत गुन्हे करणारे त्याचे साथीदार नामे २) भुषन संतोषराव राऊत, वय २१ वर्ष राह. वर्धा ३) शंतनु आदेश नेवारे, राह. सोमनाते लेआऊट रामनगर, वर्धा ४) गौरव संजयराव जबडे, वय २४ वर्ष राह. इंदिरानगर, आदीवासी कॉलनी, वर्धा जि. वर्धा ५) जतिन सतिश राऊत, वय १९ वर्ष इंदिरानगर, आदीवासी कॉलनी, वर्धा जि. वर्धा ६) अनोळखी इसम यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) अपराध क्रमांक १४०४/२०२६ कलम ३०८ (३) (५), ३१८(१), १८९(२) (४), १९०, १९१(५), ३५१(२), ३५२, ३२४(४) (५) भारतीय न्याय संहीता, २०२३ सहकलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा, १९५९ अन्वये गुन्हा दाखल होता. सदरचा गुन्हा हा टोळी प्रमुख व त्याचे टोळीतील सदस्यांनी टोळीचे आर्थीक फायद्या करीता व टोळीच्या वर्चस्वाकरीता केल्याचे निष्पन्न झाले. करिता पोलीस निरीक्षक, श्री. नागेशकुमार चतरकर, पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) यांनी पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) जि. वर्धा येथे दाखल अपराध क्रमांक १४०४/२०२६ कलम ३०८(३) (५), ३१८(१), १८९(२) (४), १९०, १९१(५), ३५१(२), ३५२, ३२४(४) (५) भारतीय न्याय संहीता, २०२३ सहकलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा, १९५९ गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ चे कलम ३(१) (दोन), ३(२), ३(४) समाविष्ट करुन महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ चे कलम २३(१) अन्वये तपास करण्याची परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपुर परिक्षेत्र, नागपुर यांना मा. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने सादर केला होता. मा. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी सादर केलेल्या प्रस्तावीची दखल घेवुन व टोळी प्रमुख व त्याचे टोळीतील सदस्यांनी टोळीचे आर्थीक फायद्या करीता व टोळीच्या वर्चस्वाकरीता पोलीस स्टेशन, वर्धा (शहर), रामनगर जि. वर्धा येथे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपुर परिक्षेत्र, नागपुर यांनी पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) जि. वर्धा येथे दाखल अपराध क्रमांक १४०४/२०२६ कलम ३०८(३) (५), ३१८(१), १८९(२) (४), १९०, १९१ (५), ३५१(२), ३५२, ३२४ (४) (५) भारतीय न्याय संहीता, २०२३ सहकलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा, १९५९ गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ चे कलम ३ (१) (दोन), ३(२), ३(४) समाविष्ट करुन महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ चे कलम २३(१) अन्वये तपास करण्याची परवानगी दिलेली असल्याने सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ अन्वये कलम वाढ करण्यात आलेली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासुन सदर गुन्ह्यातील टोळी प्रमुख व त्याचे टोळीचे सदस्य हे पसार होते. त्यांना पोलीस निरीक्षक, विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथकाने मोठ्या शिताफीने बॅरेज कॉलनी, जि. इस्ट गोदावरी, राज्य आंध्रप्रदेश येथुन ताब्यात घेतले असुन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यातील अनोळखी इसमास निष्पन्न करण्यात आलेले असुन सदर आरोपी हा विधी संघर्शीत बालक आहे.
सदर गुन्ह्याचा तपास मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपुर परिक्षेत्र, नागपुर यांचे आदेशाने श्री. राहुल आत्राम, उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्वी हे करीत आहे.
सदरची कार्यवाही मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा. श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधिक्षक, वर्धा श्री. सुनिल महाडीक, उप विभागीय पोलीस अधिकारी, वर्धा, पो.नि./श्री. विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शना खाली पोहवा/अमोल आत्राम, पोहवा / आशिष महेशगौरी, नेमणुक -स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.नि./श्री. नागेशकुमार चतरकर, पोउपनि शरद गायकवाड, सुनिल राम, मपोहवा. वैशाली करमरकर, मपोशि. करिश्मा परचाके, प्रविण शिंदे, पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) जि. वर्धा यांनी केली आहे.
दिनांक – २४-०९-२०२६
(विनोद चौधरी) पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा



