ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चाळीस वर्षांची परंपरा लाभलेला सुयोग मंडळाचा गणेशोत्सव

शहरातील मानाचा गणपती : वर्गणी न मागता साजरा होतो गणेशोत्सव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     भद्रावती शहरातील भोज-किल्ला वार्डातील चाळीस वर्षांची थोर परंपरा लाभलेला सुयोग गणेश मंडळाचा गणेशोत्सव हा शहरातील आगळावेगळा उत्सव ठरला आहे.हा गणपती शहरात माणाचा गणपती म्हणुन ओळखला जात असल्याने या गणेवाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांची येथे गर्दी होत असते.

कोणत्याही प्रकारे वर्गणी न मागता केवळ स्वेच्छेने मिळालेल्या दानावर हा गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या ऊत्सहात साजरा करण्यात येतो.या गणेशाच्या वरदानाने विविध क्षेत्रात रोजगार मिळालेले मंडळाचे भक्तगण व सदस्य दरवर्षी या ऊत्सवाचा आर्थिक भार यथाशक्ती उचलत असल्याने या सोहळ्याला कधिही आर्थिक चणचण निर्माण होत नाही. या वर्षी सुयोग मंडळातर्फे तेरा फुट उंचीच्या आकर्षक अशी आसनस्थ गणेशमुर्तिची स्थापणा करण्यात आली आहे.नवसाला पावणारा गणपती अशी या गणेशाची मान्यता असल्याने हजारो गणेशक्तत या गणेशाचे दर्शन घेतात.या मंडळाची सदस्य संख्या मोठी असुन शहरभर व शहराबाहेर अनेक सदस्य कामानिमित्त विखुरलेले आहेत. मंडळाचे अनेक सदस्य विवीध क्षेत्रात नोकरीत व व्यवसायात स्थिरावले आहेत. बाप्पाच्या कृपेमुळेच जिवनात सुखसमाधान प्राप्त झाले असल्याचे या सदस्यांना वाटत असल्याने हे सर्व सदस्य आपापल्या परीने न मागता आर्थिक मदत करीत असतात.

शहराबाहेर विखुरलेले हे सदस्य गणेशोत्सवाच्या दहा दिवसात वेळ काढुन येथे भेटी देत असतात. जुन्या सदस्यांकडून काळानुसार नव्या दमाच्या सदस्यांकडे गणेशोत्सव साजरा करण्याचा भार दिला जातो त्यामुळे नव्या दमाचे कार्यकर्ते मंडळात निर्माण होऊन गणेशोत्सव साजरा करणे सुकर होत असते.जुने जाणते सदस्य या नव्या सदस्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत असतात.असा हा सुयोग मंडळाचा हा गणेशोत्सव शहरात आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये