ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेश उत्सवानिमित्य वेळव्यात आरोग्य शिबिराचे आयोजन

७५ नागरिकांनी घेतले आरोग्य शिबिराचे लाभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

 पोंभूर्णा :- तालुक्यातील वेळवा येथे गणेश उत्सवानिमित्त श्री हनुमान गणेश मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.तालुक्यात हवामानाच्या बदलामुळे टायफाईड,डेंग्यू,मलेरिया,वायरल फिव्हरची साथ सुरू आहे.गावात ताप सर्दी खोकला यासारख्या वायरल फिव्हर असल्याचे आढळून आल्याने,सामाजिक उपक्रम म्हणून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात ७५ लोकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.

तालुक्यात सध्या ग्रामीण रुग्णालयात टायफॉइड व वायरल फीवरचे रूग्ण मोठ्या प्रमाणात भरती आहेत.ताप, सर्दी,खोकल्याचे रुग्ण गावागावात असल्याने दिवसागणिक वाढत असल्याने.वायरल फिवर व टायफाईड व डेंग्यूच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून शिवसेना तालूका प्रमुख पंकज वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली व वेळवा येथील हनुमान गणेश मंडळ व आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात बी.पी,शुगर,सी.बी. सी, टायफॉइड,सिकलसेल, थायराइट अश्या अनेक आजारावर चाचण्या घेण्यात आल्या.या शिबिरात एकूण ७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.त्यात १२ रुग्णांचे रक्ताचे चाचण्या घेण्यात आल्या.त्यात एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प – पोंभुर्णा,” जो घेईल सकस आहार ” पळून जाईल सर्व आजार ” ० ते ६ वर्ष बालक,गरोदर माता, स्तनंदा माता व किशोरवयीन मुली याचा देखील अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना घेऊन लोकचळवळीतून प्रचार आणि प्रसार करण्यात आला.शिबिरासाठी लोकांचा चांगला प्रतिसाद होता.कार्यक्रमासाठी हनुमान गणेश मंडळातील सदस्य सहकार्य केले.

या आरोग्य शिबिरात डॉ.तेजस्विनी तळेकर यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधिकारी डॉ.अस्मीता जंगले,आरोग्य सेवीका जयशाली नागदेवते, आरोग्य सेवीका अमीता नागदेवते, आशावर्कर वंदना नीमसरकार,रक्त तपासणी अधिकारी परमानंद मेश्राम, उपस्थित होते.

तर,संदीप वानखेडे,संकेत मडावी,स्वप्नील कामटकार,आदित्य मंडोगडे,अविचल जाधव,महेश बोदलवार,माणिक तोरे,सुनील उंबरवार,समीर जाधव,आकाश जाधव,जयदेव मंडोगडे, ताराचंद जाधव,राजेंद्र बोदलवार,पंकज सोनटक्के,जितेंद्र चलाख,साहिल कामटकार,शुभम कावटवार तेजस मडावी,अ अनिकेत कुळमेथे सर्व हनुमान गणेश मंडळाचे सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभले व आरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये