ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपणा बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी; अपघातांचा धोका वाढला

फुलाखाली बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा : कोरपणा बसस्टॉप परिसरातील फुलाखाली टू-व्हीलर व फोर-व्हीलर वाहनांची मोठ्या प्रमाणात होणारी पार्किंग नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्याच्या दुतर्फा तसेच फुलाखाली वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून पादचारी, विद्यार्थी, महिला तसेच वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या परिसरात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बेशिस्त पार्किंग आणि वाहनांची गर्दी यामुळे किरकोळ अपघातांसह अपघातांचा धोका वाढला असल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेषतः बसस्थानक परिसरात अचानक रस्ता ओलांडणारे नागरिक आणि वेगाने ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनत आहे.

या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, कोरपणा बसस्टॉप फुलाखाली कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून वाहतुकीसाठी आवश्यक जागा मोकळी करावी, अशीही मागणी आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची प्रशासनाने वाट पाहू नये. अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा कोरपणा शहरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये