पावर लिफ्टिंग स्पर्धेत निमिष पुरीची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी.
आशिष रैच, राजुरा.
राजुरा :- जिल्हास्तरीय 19 वर्षाखालील 53 किलो वजन गटातील पावर लिफ्टिंग स्पर्धेत राजुरा तालुक्यातील ऍडवोकेट यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी निमिश उद्धव पुरी याने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. निमिष पुरी याच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली असून त्याच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
याकरिता संस्थेचे उपाध्यक्ष एडवोकेट संजय धोटे, कोषाध्यक्ष सतीश धोटे, सचिव डॉक्टर अर्पित धोटे, अनुराधा धोटे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राध्यापक वर्षा पोडे,पर्यवेक्षक प्राध्यापक इरशाद शेख, क्रीडा मार्गदर्शक शिक्षक प्राध्यापक रोहित रांजीकर, प्राध्यापक कल्पना कवाडे तसेच इतर सर्व विभाग प्रमुख आणि सर्व प्राध्यापक वृंद व मित्र मंडळ यांनी निमिष उद्धव पुरी यांचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. निमिशने आपल्या मेहनतीच्या जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. निमिश च्या या यशाबद्दल गडचांदूर परिसरातून सुद्धा अभिनंदनचा वर्षाव होत आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय जिम चे कोच व मार्गदर्शक गौरव भटारकार व कनिष्ठ महाविद्यालयास दिले आहे.


