ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंमली पदार्थ विरोधी जनजागृती उपक्रमाची विशेष मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

अंमली पदार्थाच्या घातक व्यसनात विळख्यात नागरीक विशेषतः युवक वर्ग अडकताना दिसतो आहे.

ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर, कुटुंबावर आणि समाजावर विपरीत परिणाम होत आहे, अंमली पदार्थाचे सेवन केवळ व्यक्तीचे शारीरिक व मानसिक स्वास्थ बिघडवत नाही तर गुन्हेगारीला प्रवृत्तीला चालना देत असतो.

शासनाने सन २०२६ २०२९ या कालावधीत अंमली पदार्थ नियंत्रणा उद्दीष्ठ ठेवून अंमली पदार्थ नियंत्रण संबंधाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून अंमली पदार्थ नियंत्रण उपक्रम राबविण्याचे उद्दीष्ठ देण्यात आलेले आहे.

त्याअनुषंगाने Drugs Free Wardha या उपक्रमाअंतर्गत माहे ऑगस्ट / २०२६ मध्ये जिल्हयातील १९ पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्राअंतर्गत शाळा, महाविद्यालये व ईतर शैक्षणिक आस्थापणा ईत्यादींमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती उपक्रमाची विशेष मोहीम आयोजीत करण्यात आली होती.

सदर Drugs Free Wardha या उपक्रमाअंतर्गत माहे ऑगस्ट / २०२६ मध्ये जिल्हयातील एकुण १७२ शाळां, महाविद्यालये, व ईतर ठिकाणी विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये जवळ जवळ २५,००० विर्धार्थी व नागरीकांची उपस्थिती होती.

श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. सदाशीव वाघमारे अपर पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्हा पोलीस दल, वर्धा जिल्हयातुन अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करण्यास कटीबध्द असुन, यापुढेही अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटणाचे दृष्टीने जिल्हयात अंमली पदार्थ विरोधी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

(विनोद चौधरी) पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये