“रेती ची चोरटी वाहतुक करणाऱ्या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा पोलीस अधीक्षक मा.श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणा-या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाने अवैध व्यवसाय करणा-या गुन्हेगारांवर कार्यवाही करण्याची धडक मोहिम राबविली असुन, सदर मोहिमेदरम्यान दिनांक 22 सप्टेंबर 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा येथील पथकास मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे मौजा पारडी शिवारातील वणा नदी पात्राचे चाकुर घाटाचे पांदण रस्त्यावर एका जॉन डीरे 5050डि. कंपनीचा हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर क्र. एम.एच. 32 ए.एस. 8647 वर सापळा रचुन कार्यवाही केली असता, आरोपी हे मोक्कावर रंगेहाथ त्यांचे स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या पारडी शिवारातील वणा नदी पात्राचे चाकुर घाटातुन रेतीची चोरी करून, विना परवाना रेतीची वाहतुक करतांना मिळुन आल्याने, जागीचं आरोपीतांचे ताब्यातुन ट्रॅक्टर ट्रॉलीसह 1.5 ब्रास रेती जु.किं. 10,65,000 रू. चा मुद्देमाल जप्त करून, मालक सचिन चिंदुजी बुचके व त्याचा भाऊ मंगेश बुचके दोन्ही रा. पारडी, चालक आकाश गजानन खांदवे रा. भोसा व वाहक नितेश मोहन वाघमारे रा. पारडी अशा एकुण 04 आरोपीतांविरूध्द पो.स्टे. सिंदी (रेल्वे) येथे रेती चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.अं., अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, सागर भोसले सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली


