ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोटर सायकलने जात असलेल्या इसमाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून केली हत्या : अज्ञात आरोपी फरार

नाग मंदिर चौकातील घटना : भद्रावती शहरात एकच खळबळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           शहरतील नाग मंदिर चौकात सकाळी मोटारसायकलवरून जात असलेल्या ४० वर्षीय इसमाच्या मानेवर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी ७.३० वाजताचे सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अज्ञात मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले आहेत.

       मृतकाची ओळख उमदेव भावराव मेश्राम वय ४० रा. देऊरवाडा भद्रावती असे असुन हल्ली तो शिवाजीनगर, प्रज्ञा वाचनालयाजवळ, भद्रावती इथे राहत असल्याचे सांगन्यात आले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उमदेव मेश्राम हे बुधवारी सकाळी सुमारे ७.३० वाजता घरून मोटारसायकलने निघाले होते. ते नागमंदिर चौकाजवळ पोहोचताच अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यात मानेवर गंभीर वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, हल्लेखोर कोण? हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली? याचा तपास पोलिसांकडून सुरू असून, अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

या थरारक हत्याकांडामुळे भद्रावती शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये