ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनैशा वाहन चालक संघटनेचे अभियान

चालकाच्या घर चलो संवाद अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

वाहन चालक हे कामानिमित्त सतत बाहेर जात असल्याने संघटनेच्या कार्यासाठी पाहिजे तो वेळ देता येत नाही. त्यामुळे वाहन चालक कामगार संघटनेची एकसंघ संघटनशक्ती निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत असते. यावर उपाय योजना करण्यासाठी वाहन चालक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाहन चालक यांच्या परिवाराशी थेट संपर्क साधून संघटनेचे धेय्य आणि उद्दिष्टे यांची माहिती देऊन परिवारातील सदस्यांना संघटनेत सहभागी करून घेतले पाहिजे आणि वाहन चालकांच्या घर चलो संवाद अभियान राबविण्यात यावे.

असे प्रतिपादन अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे यांनी केले.

ट्रान्सपोर्ट नगर अंबुजा फाटा हरदोना येथे तारीख २० सप्टेंबर २०२६ रोज रविवारला सायंकाळी पाच वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे हे होते.

संघटनेचे महाराष्ट्र सल्लागार अशोककुमार उमरे यांनी संघटनेचे धेय्य धोरणे तसेच वाहन चालकांच्या परिवारासोबत घर चलो संवाद अभियान याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष चंपतभाऊ राजूरकर यांनी केले. तर आभारप्रदर्शन संघटनेचे मिडिया प्रभारी प्रफुल्ल खनके यांनी मानले.

बैठकीला संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते आकाश ताकसांडे, संजय साळवे, युवा जिल्हाउपाध्यक्ष हंसराज ताकसांडे, राजू गेडाम, शेख वसीम मुर्तिजापूर, विजय इंगोले मंगरुळपीर, नरेश कुमार रोहतास, जीबोध मेहता औरंगाबाद बिहार, प्रशांत व्यवहारे नांदेड, जनाब अली अंसारी वैशाली बिहार इत्यादींनी बैठक यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये