आरोग्य विभागाअंतर्गत “तिशीचा पल्ला_तपासणीचा सल्ला” मोहीम संपन्न
आरोग्य तपासणी शिबिरात ३८३ रुग्णांची तपासणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार व तालुका आरोग्य अधिकारी गोंडपिपरी यांचे मार्गदर्शनात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘तिशीचा पल्ला_तपासणीचा सल्ला’ या उपक्रमांतर्गत शहरातील गणेश मंडळात आरोग्य तपासणी शिबिर मोहीम राबविण्यात आले.
हि शिबिर रामसेना व्यापारी गणेश मंडळ गांधी चौक, बालगोपाल गणेश मंडळ बाजार वॉर्ड, छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ शिवाजी वॉर्ड, गोंडपिपरीचा राजा गणेश मंडळ धाबा रोड इत्यादी सार्वजनिक गणेश मंडळात राबविण्यात आले.
या आरोग्य तपासणी शिबिरात बी.पी. रुग्ण- १०७, शूगर रुग्ण – १२२, लॅब तपासणी – ७२ , जनरल तपासणी – ८२ असे एकुण ३८३ नागरिकांची तपासणी करून आरोग्य सेवेचा लाभ देण्यात आला.
सदर मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र धाबाचे वैद्यकीय अधिकारी दिपक जोगदंड यांचे नेतृत्वात आणि डॉ.सुनेक्षा देवतळे, डॉ.सायली मुरमुरवार, प्राथमिक आरोग्य केंद्र धाबाचे आरोग्य सेवक देवपाल मेश्राम, नागदेवते, भीमनपलीवार, आरोग्यसेविका श्रुती दहेलकर, सुनिता कुंभारे, वर्षा भगत, मीना मेश्राम,पल्लवी कडते, कविता आसंगारी इत्यादींनी कार्यभार सांभाळला.
या दिनाच्या निमित्ताने गोर गरीब जनतेला सुलभ आणि मोफत आरोग्य सेवा त्यांच्या परिसरातच उपलब्ध व्हावा हा यामागचा उद्देश होता. सदर उपक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे संपन्न झाले.



