ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खरीप हंगाम २०२६ साठी ई-पीक पाहणी नोंदणी ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा

DCS MH मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी करण्याचे तहसील कार्यालय पोंभुर्णाचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम २०२६ साठी डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) अंतर्गत ई-पीक पाहणीची प्रक्रिया सुरू असून, सर्व शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी DCS MH (Digital Crop Survey Maharashtra) या नवीन मोबाईल ॲपद्वारे आपल्या पिकांची नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन तहसील कार्यालय पोंभुर्णा यांनी केले आहे.

यंदापासून पूर्वीच्या ई-पीक पाहणी ॲपऐवजी DCS MH हे नवीन अधिकृत ॲप वापरण्यात येत आहे. पिकांची अचूक नोंद सातबारा उताऱ्यावर होण्यासाठी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.

यंदाचे महत्त्वाचे बदल गुगल प्ले स्टोअरवरून DCS MH – E-Peek Pahani हे अधिकृत ॲप डाउनलोड करून नोंदणी करावी.

प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ई-पीक पाहणी सहाय्यक नियुक्त करण्यात आले आहेत.

ई-पीक पाहणी न केल्यास संभाव्य अडचणी

पीक विमा व नुकसानभरपाई मिळण्यात अडथळे.

नैसर्गिक आपत्ती किंवा दुष्काळातील शासकीय मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता.

हमीभाव (MSP) खरेदी केंद्रावर माल विक्रीमध्ये अडचण.

पीक कर्ज प्रक्रियेवर परिणाम.

नोंदणी करताना घ्यावयाची काळजी

प्रत्यक्ष शेतात उभे राहून GPS लोकेशनसह पिकाचा फोटो अपलोड करावा.

मुख्य पिकासोबत मिश्र पिकांचीही अचूक नोंद करावी.

तांत्रिक अडचण आल्यास शेतकऱ्यांनी आपल्या गावातील ई-पीक पाहणी सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी तातडीने संपर्क साधावा. तालुक्यातील सर्व खातेदार शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी DCS MH ॲपवर ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करून विविध शासकीय योजना व सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालय पोंभुर्णा यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये