ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

योगशिक्षकाच्या वाढदिवशी विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

वृक्षारोपण आणि शिक्षणाला चालना देणारे उपक्रम राबवून योगशिक्षक गणेश डहाळे यांचा वाढदिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ तालुक्यातील धानापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळेचे योग शिक्षक गणेश डहाळे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करून वाढदिवस साजरा करण्यात आला. शाळेच्या समस्त विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या दीर्घायुष्याच्या कामना करत, शाळेत वृक्षारोपण करून समाजाला पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.

 योगशिक्षक गणेश डहाळे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवून, प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि कमी होत चाललेले हरित क्षेत्र लक्षात घेता पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असल्याचे मत योगशिक्षक गणेश डहाळे यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या योगगुरूना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना समाजोपयोगी उपक्रमांची ही परंपरा अधिक व्यापक करण्याची अपेक्षा व्यक्त केली. पर्यावरण संवर्धन, शिक्षणाला प्रोत्साहन आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही मूल्यांचा सुंदर संगम घडवून आणत वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छा, पुष्पगुच्छ आणि जाहिरातींचा सोहळा नव्हे, तर समाजासाठी काहीतरी विधायक करण्याची संधी असू शकते, याचा प्रत्यय धानापूर जिल्हा परिषद शाळेत दिसून आला.

वाढदिवसाप्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शैक्षणिक वाटचालीतील अडथळे दूर होतील अशी आवश्यक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शेखर दहिवले सर यांनी गणेश डहाळे यांचे भरभरून कौतुक केले. या छोटेखाणी कार्यक्रमाला सरपंच योगीता वडस्कर, पोलिस पाटील प्रफुल आलाम, पत्रकार नागेश इटेकर , शिक्षकवृंद तेलकापल्लिवार, वाकडे, कुबडे, कन्नाके तथा विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये