ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोफत कायदेशीर मदतीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा!

मुख्य लोक अभिरक्षक अॅड विनोद बोरसे यांचे आवाहन 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : न्यायापासुन कोणीही वंचित राहू नये यासाठी गरजू घटकांकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात.त्यापैकीच मोफत कायदेशीर मदतीसाठी टोल फ्री क्रमांक १५१०० ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.गरजु व्यक्तींनी या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक अॅड विनोद बोरसे यांनी केले.

     चंद्रपूर येथील महानगरपालिकेच्या पटांगणात दि.१८सप्टेंबर रोजी शुक्रवारी ‘ राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत गरजू घटकांकरीता मोफत कायदेशीर मदतीसाठी टोल फ्री क्रमांक १५१०० व नालसा पोर्टल ‘ या विषयावर आयोजित केलेल्या कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात अॅड विनोद बोरसे बोलत होते.

कोणाला मोफत विधी सेवा मिळु शकते ?

महिला,बालके,दिव्यांग व्यक्ती, तस्करीचे पिडीत, कैदी तसेच अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे सदस्य, आपत्ती,जातीय हिंसाचार व अत्याचार पिडीत व औद्योगिक कर्मचारी तसेच ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे अशा घटकांना मोफत विधी सेवा मिळु शकते याबद्दल देखील महत्त्वाची माहिती अॅड बोरसे यांनी दिली.

काय आहे टोल फ्री क्रमांक?

मोफत कायदेशीर मदतीसाठी १५१०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अॅड बोरसे यांनी केले.व त्याबाबतचे माहिती पत्रकाचे वाटप यावेळी करण्यात आले.

 महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेकडील निर्देशांनुसार समान किमान कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री अभय लाहोटी यांच्या आदेशाने व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री सुधीर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  या कार्यक्रमाला अविनाश बुरडकर,दिनकर चौधरी, रामदास चन्नुरवार , अविनाश टेकुलवार, महादेव गहुकार, सुधाकर पवार, अशोक बोकडे, संजय गोलाईत ,गड्ड्मवार बाबा आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये