ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पर्यावरणपूरक गणेश निर्मिती उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना : गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कोरपना तालुक्यातील गडचांदूर केंद्रांतर्गत असलेल्या लालगुडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आनंददायी शनिवार दप्तरमुक्त शाळा नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पर्यावरण पूरक गणेश मूर्ती निर्मिती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

          विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कल्पकतेतून सुंदर गणेश मूर्ती साकारल्या. कलेतून पर्यावरण संवर्धन हा संदेश देत पर्यावरण पूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे महत्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून जाणून घेतले.

           शाळेचे उपक्रमशील शिक्षक गोविंद पेदेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखी खाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.त्यांनी विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती विसर्जनामुळे जल स्त्रोतांचे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरण पूरक साहित्याचा वापर करून गणेश मूर्ती निर्मितीचे प्रात्यक्षिक करून दाखवले.विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम ज्ञानवर्धक, सर्जनशील आणि आनंददायी अनुभव ठरला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये