मा. न्यायमूर्ती श्रीमती अन्सारी मॅडम डी. जे.कोर्ट 3 वर्धा यांनी सेलू पोलीस स्टेशन येथील बलात्कारातील आरोपीला ठोठावली वीस वर्षा शिक्षा व दहा हजार दंड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
नमूद घटना तारीख वेळी व स्थळी यातील पीडित ही शाळेकरीता गेली असता आरोपीने अल्पवयीन मुलीला नुडल्स खायला जाऊ म्हणून हाॅटेलवर घेऊन गेला त्यानंतर तिला लाॅजवर नेऊन जबरी ने संभोग केला वरुन सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन सेलू येथे दाखल करण्यात आला अपराध क्रमांक 639/23 कलम 376,376(3)506,109 भादवी सह कलम 4,17,21 पोक्सो मध्ये आरोपी नामे गौरव राजेन्द्र लाकड वय 24 वर्ष राहणार खापरी तहसील सेलू जिल्हा वर्धा नोंद करून तपासात घेतला सदर गुन्हांचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनुराधा फुकट यांनी करून मा, कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले पीडितेच्या तक्रारीवरून दाखल या खटल्यात पैरवी अधिकारी महिला पोलीस हवालदार कोडापे यांनी यांनी मोलाची कामगिरी बजावली मा. न्यायमूर्ती श्रीमती अन्सारी मॅडम डी.जे.3 कोर्ट वर्धा यांनी कोर्ट केस क्रमांक 106/2023 वरुन गुन्हातील आरोपी यास कलम 376,376(3)भादवी व कलम 4 पोक्सो मध्ये दोषी ठरवून 20 वर्षांचा सश्रम कारावास व 10,000/- रुपयांचा दंड व दंड न भरल्यास 6 महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.



