ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सतर्क (2+) या डिजिटलाईजेशन प्रणालीचा वापरामुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार पोलीसांच्या रडारवर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यातील दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची माहिती संकलित करून प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याचे काम पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करणे चालू असून सध्याचे डिजिटल युगात सदर कामाचे डिजिटलाईजेशन होवून सदर काम अधिक प्रभावी करण्याचे उद्देशाने प्रोजेक्ट सतर्क हा अत्यंत महत्वपूर्ण नवीन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

यामुळे जिल्ह्यातील दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या (2+) गुन्हेगारांची अद्यावत यादी तयार करण्यात आली आहे. त्यात शरीराविरुद्धचे एकुण 1325 गुन्हेगार, मालमत्तेविरुद्धचे एकुण 275 गुन्हेगार, NDPS चे एकुण 145 गुन्हेगार, दारूबंदी कायद्याअन्वये चे 4332 गुन्हेगार व ईतर गुन्हेगार यांची या हेडप्रमाणे अद्यावत यादी तयार करण्यात आली आहे. यावरून त्यांचे गुन्ह्याचे पद्धतीवरून त्यांचेविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करणे सुलभ झाले आहे. या प्रणालीचा उपयोग करून 01 जानेवारी 2026 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत वर्धा जिल्ह्यात कलम 55,56,57 म.पो.का. अन्वये 19 पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 55 म.पो.का. अन्वये 05 प्रस्तावावर कारवाई करण्यात आली आहे, कलम 56 म.पो.का. अन्वये 137 प्रस्तावावर कारवाई करण्यात आली आहे व कलम 57 म.पो.का. अन्वये 17 प्रस्तावावर कारवाई करण्यात आली आहे. सध्यास्थितीत वर्धा जिल्ह्यात कलम 55 म.पो.का. अन्वये एकूण 15, कलम 56 म.पो.का. अन्वये एकूण 03 असे एकूण 18 इसम हद्दपार असून सादर केलेल्या प्रस्तावावर कारवाईची प्रक्रिया संपवुन हद्दपार करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व 19 पोलीस स्टेशन अंतर्गत कलम 129 बी.एन.एस.एस. अन्वये 483 प्रस्ताव तसेच कलम 126 बी.एन.एस.एस. अन्वये 4414 प्रस्तावावर कारवाई झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेते व धोकादायक 07 इसमांनां एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करून कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. तसेच अंमली पदार्थ संबंधाने गुन्हे करणा-या 01 ईसमावर PIT NDPS कायद्याअन्वये कारवाई करुन सदर ईसमास कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 अधिनियमाचा मुख्य उद्देश संघटित गुन्हेगारी कारवायांना आळा घालणे, गुन्हेगारी टोळ्यांचे नेटवर्क मोडून काढून खंडणी वसुली, अंमली पदार्थाची तस्करी आणि हिंसाचार यांसारख्या संघटित गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवणे करिता वर्धा जिल्ह्यात संघटितरित्या टोळी तयार करून गुन्हे करणाऱ्या 06 टोळीतील एकूण 30 इसमांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे.

एकंदरीत वरील कार्यपद्धतीचा अवलंब केल्यामुळे संपूर्ण डेटा एका क्लिक वर उपलब्ध होऊन वेळेवर आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यामुळे गंभीर शारीराविरुद्धचे गुन्ह्यात व मालमत्ताविषयक गुन्ह्यामध्ये लक्षणीय घट झाली आहे. याच प्रणालीमुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार पोलीसांच्या रडारवर असुन या प्रणालीचे मदतीने यापुढे सुद्धा दोनपेक्षा जास्त गुन्हे असणा-या गुन्हेगारांवर वेळीच अत्यंत कडक प्रभावी प्रतिबंधक कारवाई करून गुन्हेगारी कमी करण्याकरिता प्रोजेक्ट सतर्क या डिजिटलाईजेशन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये