ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशोत्सव २०२६ : वर्धा पोलीस दल सज्ज! शांतता, शिस्त, सुरक्षितता आणि पर्यावरण पूरक उत्सवासाठी वर्धा पोलिसांची व्यापक पूर्वतयारी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आगामी गणेशोत्सव २०२६ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गणेशोत्सव उत्साहपूर्ण तसेच शांततामय वातावरणात पार पडावा आणि ध्वनी प्रदुषण व लेझर लाईट वापरावर प्रभावी नियंत्रण राहावे, यासाठी वर्धा पोलीस दलाने व्यापक व बहुआयामी पूर्वतयारी केली आहे. गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव आहे. या उत्सवाला सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सामाजिक सलोखा जपणारे स्वरूप मिळावे, यासाठी वर्धा पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे.

ध्वनी प्रदूषणावर पोलिसांची कडक नजर :-

गणेशोत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३६ तसेच कलम ३८(१) अन्वये पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे कडुन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत व याची व्यापक प्रसिध्दी करण्यात आली आहे. ध्वनीक्षेपक, लाऊडस्पिकर, अॅम्प्लीफायर व इतर ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांचा वापर करताना मा. सर्वोच्च न्यायालय, मा. उच्च न्यायालय व शासनाने निश्चित केलेल्या ध्वनी मर्यादेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता क्षेत्रांमध्ये Noise Level Meter द्वारे ध्वनी पातळीचे प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेण्यात आले आहे. त्यामुळे उत्सवाच्या कालावधीत ध्वनी पातळीतील वाढ किंवा नियमांचे उल्लंघन यावर प्रभावीपणे लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असून, उत्सवाचा आनंद इतर नागरिकांच्या शांततेच्या व आरोग्याच्या अधिकारावर गदा आणणारा ठरणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.

धोकादायक लेझर लाईटवर प्रतिबंध:-

गणेशोत्सवातील मिरवणुका व इतर कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येणाऱ्या Laser Light मुळे नागरिक, वयोवृध्द व्यक्ती, लहान मुले तसेच विशेषतः वाहनचालकांच्या दृष्टीस धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मा. जिल्हाधिकारी, वर्धा यांनी कलम १६३ BNSS नुसार वर्धा जिल्हयामध्ये लेझर लाईटच्या वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणेला आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

बैठकांमधून समन्वयाला प्राधान्यः-

गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी गणेश मंडळे, ध्वनीक्षेपक चालक-मालक, शांतता समिती आणि नागरिक यांच्यात समन्वय निर्माण करण्यावर वर्धा पोलिसांनी विशेष भर दिला आहे. मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्या स्तरावर ध्वनीक्षेपक, लाऊडस्पिकर, अॅम्प्लीफायर व इतर ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांचे मालक, गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच शांतता समितीच्या सदस्यांच्या बैठका घेऊन उत्सवादरम्यान पाळावयाचे नियम, ध्वनी मर्यादा, मिरवणुकीतील शिस्त, वाहतूक व्यवस्था आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार यांनी शांतता समिती, गणेश उत्सव आयोजक मंडळे, डीजे चालक व मालक यांच्या स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या असून स्थानिक पातळीवरील संभाव्य समस्या, मिरवणूक मार्ग, वेळापत्रक आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत समन्वय साधण्यात आला आहे व ध्वनी प्रदूषणबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहे

‘गणराया स्पर्धा २०२६’ उत्सवातून सामाजिक संदेशाला प्रोत्साहन :-

वर्धा पोलीस दलाकडून यावर्षी “गणराया उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा-२०२६” चे आयोजन करण्यात आले असुन सायबर सुरक्षीत गणेशोत्सव, अंमली पदार्थ विरोधी अभियान, महिला व बाल सुरक्षा, वाहतुक सुरक्षा, पर्यावरण पूरक गणेशोत्सव, आरोग्य तपासणी शिबीर, कायदा व सुव्यवस्था शिस्त या विषयावर स्पर्धा आयोजीत केली असुन प्रत्येक पो.स्टे. स्तरावर व पोलीस अधीक्षक कार्यालयस्तरावर ३ उत्कृष्ट गणेश मंडळ यांना पारीतोषीक देवून वर्धा जिल्हा पोलीस दला तर्फे सन्मान करण्यात येणार आहेत. यामुळे उत्सव केवळ जल्लोषाचा नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचा आहे हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा वर्धा पोलिसांचा प्रयत्न आहे.

दंगा काबू योजनेची रंगीत तालीम रूट मार्चद्वारे पोलिसांची सज्जताः-

गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही अनुचित परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली आहे. पोलीस अधिकारी व अंमलदारांना संभाव्य परिस्थितीत जलद प्रतिसाद, जमाव नियंत्रण, संवेदनशील ठिकाणांचे संरक्षण आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत प्रत्यक्ष सराव करून देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील विविध संवेदनशील व महत्त्वाच्या भागांमध्ये रूट मार्च घेण्यात आले असून, पोलीस दलाची सज्जता आणि प्रभावी उपस्थिती नागरिकांना जाणवून देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.

२४x७ सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल कार्यान्वित :-

गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत सोशल मीडियावरील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन वर्धा येथे २४x७ Social Media Monitoring Cell कार्यान्वित राहणार आहे. सोशल मीडियावर अफवा, आक्षेपार्ह किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, व्हिडिओ, संदेश अथवा अन्य स्वरूपातील मजकूर प्रसारित करून सामाजिक सलोखा व कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये किंवा ती पुढे प्रसारित करू नये. संशयास्पद किंवा आक्षेपार्ह माहिती आढळल्यास ती स्वतःहून व्हायरल न करता तत्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून देणेबाबत आवाहन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी केले आहे.

गणेशोत्सवासाठी चोख सुरक्षा व्यवस्था; २४०० पेक्षा अधिक पोलीस मनुष्यबळ तैनात :-

गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वर्धा पोलीस दलाकडून चोख सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. बंदोबस्त कालावधीत एकूण ११४ पोलीस अधिकारी, १२०० पोलीस अंमलदार, २ दंगल नियंत्रण पथक, १ जलद प्रतिसाद पथक, १०८० होमगार्ड तसेच १ एस. आर. पी. एफ. तुकडी तैनात राहणार आहे. जिल्ह्यातील गणेश मंडळे, मिरवणूक मार्ग, संवेदनशील ठिकाणे, गर्दीची ठिकाणे तसेच महत्त्वाच्या चौकांवर आवश्यकतेनुसार अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोणत्याही अनुचित प्रकारास तात्काळ प्रतिसाद देता यावा, यासाठी अधिकारी व अंमलदारांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी वर्धा पोलीस दल पूर्णपणे सज्ज असून, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकाराविरुद्ध तत्काळ व कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई:-

वर्धा पोलीस दलाकडून गणेश मंडळे व नागरिकांना उत्सव साजरा करण्यास पूर्ण सहकार्य केले जाणार आहे. मात्र कायद्याचे उल्लंघन, निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन, प्रतिबंधित लेझर लाईटचा वापर, सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण करणारे कृत्य किंवा सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या कृती कोणत्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती, आयोजक, डीजे चालक/मालक किंवा जबाबदार व्यक्तींविरुद्ध लागू कायद्यांनुसार कडक कारवाई करण्यात येईल.

श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे आवाहन :-

गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती, सामाजिक एकोपा आणि आनंदाचा उत्सव आहे. वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी हा उत्सव मोठ्या उत्साहात, मात्र शांतता, शिस्त आणि कायद्याचे पालन करून साजरा करावा. गणेश मंडळांनी ध्वनी मर्यादा, मिरवणुकीचे नियम, वाहतूक व्यवस्था तसेच प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. प्रतिबंधित लेझर लाईटचा वापर करू नये. सोशल मीडियावरील अफवा, आक्षेपार्ह संदेश किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नका आणि त्या पुढे प्रसारित करू नका. कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना द्या. वर्धा पोलीस दल आपल्या सेवेसाठी २४ तास सज्ज आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे [9/11, 7:03 PM] पत्रकार महाजागरन व सारथी📝: दिनांक ११.०९.२०२६ गणेशोत्सव २०२६ : वर्धा पोलीस दल सज्ज! शांतता, शिस्त, सुरक्षितता आणि पर्यावरण पूरक उत्सवासाठी वर्धा पोलिसांची व्यापक पूर्वतयारी आगामी गणेशोत्सव २०२६ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गणेशोत्सव उत्साहपूर्ण तसेच शांततामय वातावरणात पार पडावा आणि ध्वनी प्रदुषण व लेझर लाईट वापरावर प्रभावी नियंत्रण राहावे, यासाठी वर्धा पोलीस दलाने व्यापक व बहुआयामी पूर्वतयारी केली आहे. गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव आहे. या उत्सवाला सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सामाजिक सलोखा जपणारे स्वरूप मिळावे, यासाठी वर्धा पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे.

ध्वनी प्रदूषणावर पोलिसांची कडक नजर :-

गणेशोत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३६ तसेच कलम ३८(१) अन्वये पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे कडुन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत व याची व्यापक प्रसिध्दी करण्यात आली आहे. ध्वनीक्षेपक, लाऊडस्पिकर, अॅम्प्लीफायर व इतर ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांचा वापर करताना मा. सर्वोच्च न्यायालय, मा. उच्च न्यायालय व शासनाने निश्चित केलेल्या ध्वनी मर्यादेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता क्षेत्रांमध्ये Noise Level Meter द्वारे ध्वनी पातळीचे प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेण्यात आले आहे. त्यामुळे उत्सवाच्या कालावधीत ध्वनी पातळीतील वाढ किंवा नियमांचे उल्लंघन यावर प्रभावीपणे लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असून, उत्सवाचा आनंद इतर नागरिकांच्या शांततेच्या व आरोग्याच्या अधिकारावर गदा आणणारा ठरणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.

धोकादायक लेझर लाईटवर प्रतिबंध:-

गणेशोत्सवातील मिरवणुका व इतर कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येणाऱ्या Laser Light मुळे नागरिक, वयोवृध्द व्यक्ती, लहान मुले तसेच विशेषतः वाहनचालकांच्या दृष्टीस धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मा. जिल्हाधिकारी, वर्धा यांनी कलम १६३ BNSS नुसार वर्धा जिल्हयामध्ये लेझर लाईटच्या वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणेला आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे

बैठकांमधून समन्वयाला प्राधान्यः-

गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी गणेश मंडळे, ध्वनीक्षेपक चालक-मालक, शांतता समिती आणि नागरिक यांच्यात समन्वय निर्माण करण्यावर वर्धा पोलिसांनी विशेष भर दिला आहे. मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्या स्तरावर ध्वनीक्षेपक, लाऊडस्पिकर, अॅम्प्लीफायर व इतर ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांचे मालक, गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच शांतता समितीच्या सदस्यांच्या बैठका घेऊन उत्सवादरम्यान पाळावयाचे नियम, ध्वनी मर्यादा, मिरवणुकीतील शिस्त, वाहतूक व्यवस्था आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार यांनी शांतता समिती, गणेश उत्सव आयोजक मंडळे, डीजे चालक व मालक यांच्या स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या असून स्थानिक

पत्रकार महाजागरन व सारथी📝: पातळीवरील संभाव्य समस्या, मिरवणूक मार्ग, वेळापत्रक आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत समन्वय साधण्यात आला आहे व ध्वनी प्रदूषणबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहे.

‘गणराया स्पर्धा २०२६’ उत्सवातून सामाजिक संदेशाला प्रोत्साहन :-

वर्धा पोलीस दलाकडून यावर्षी “गणराया उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा-२०२६” चे आयोजन करण्यात आले असुन सायबर सुरक्षीत गणेशोत्सव, अंमली पदार्थ विरोधी अभियान, महिला व बाल सुरक्षा, वाहतुक सुरक्षा, पर्यावरण पूरक गणेशोत्सव, आरोग्य तपासणी शिबीर, कायदा व सुव्यवस्था शिस्त या विषयावर स्पर्धा आयोजीत केली असुन प्रत्येक पो.स्टे. स्तरावर व पोलीस अधीक्षक कार्यालयस्तरावर ३ उत्कृष्ट गणेश मंडळ यांना पारीतोषीक देवून वर्धा जिल्हा पोलीस दला तर्फे सन्मान करण्यात येणार आहेत. यामुळे उत्सव केवळ जल्लोषाचा नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचा आहे हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा वर्धा पोलिसांचा प्रयत्न आहे.

दंगा काबू योजनेची रंगीत तालीम रूट मार्चद्वारे पोलिसांची सज्जताः-

गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही अनुचित परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली आहे. पोलीस अधिकारी व अंमलदारांना संभाव्य परिस्थितीत जलद प्रतिसाद, जमाव नियंत्रण, संवेदनशील ठिकाणांचे संरक्षण आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत प्रत्यक्ष सराव करून देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील विविध संवेदनशील व महत्त्वाच्या भागांमध्ये रूट मार्च घेण्यात आले असून, पोलीस दलाची सज्जता आणि प्रभावी उपस्थिती नागरिकांना जाणवून देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.

२४x७ सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल कार्यान्वित :-

गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत सोशल मीडियावरील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन वर्धा येथे २४x७ Social Media Monitoring Cell कार्यान्वित राहणार आहे. सोशल मीडियावर अफवा, आक्षेपार्ह किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, व्हिडिओ, संदेश अथवा अन्य स्वरूपातील मजकूर प्रसारित करून सामाजिक सलोखा व कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये किंवा ती पुढे प्रसारित करू नये. संशयास्पद किंवा आक्षेपार्ह माहिती आढळल्यास ती स्वतःहून व्हायरल न करता तत्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून देणेबाबत आवाहन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी केले आहे.

गणेशोत्सवासाठी चोख सुरक्षा व्यवस्था; २४०० पेक्षा अधिक पोलीस मनुष्यबळ तैनात :-

गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वर्धा पोलीस दलाकडून चोख सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. बंदोबस्त कालावधीत एकूण ११४ पोलीस अधिकारी, १२०० पोलीस अंमलदार, २ दंगल नियंत्रण पथक, १ जलद प्रतिसाद पथक, १०८० होमगार्ड तसेच १ एस. आर. पी. एफ. तुकडी तैनात राहणार आहे. जिल्ह्यातील गणेश मंडळे, मिरवणूक मार्ग, संवेदनशील ठिकाणे, गर्दीची ठिकाणे तसेच महत्त्वाच्या चौकांवर आवश्यकतेनुसार अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोणत्याही अनुचित प्रकारास तात्काळ प्रतिसाद देता यावा, यासाठी अधिकारी व अंमलदारांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी वर्धा पोलीस दल पूर्णपणे सज्ज असून, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकाराविरुद्ध तत्काळ व कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

पत्रकार महाजागरन व सारथी📝: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई:-

वर्धा पोलीस दलाकडून गणेश मंडळे व नागरिकांना उत्सव साजरा करण्यास पूर्ण सहकार्य केले जाणार आहे. मात्र कायद्याचे उल्लंघन, निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन, प्रतिबंधित लेझर लाईटचा वापर, सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण करणारे कृत्य किंवा सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या कृती कोणत्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती, आयोजक, डीजे चालक/मालक किंवा जबाबदार व्यक्तींविरुद्ध लागू कायद्यांनुसार कडक कारवाई करण्यात येईल.

श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे आवाहन :-

गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती, सामाजिक एकोपा आणि आनंदाचा उत्सव आहे. वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी हा उत्सव मोठ्या उत्साहात, मात्र शांतता, शिस्त आणि कायद्याचे पालन करून साजरा करावा. गणेश मंडळांनी ध्वनी मर्यादा, मिरवणुकीचे नियम, वाहतूक व्यवस्था तसेच प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. प्रतिबंधित लेझर लाईटचा वापर करू नये. सोशल मीडियावरील अफवा, आक्षेपार्ह संदेश किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नका आणि त्या पुढे प्रसारित करू नका. कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना द्या. वर्धा पोलीस दल आपल्या सेवेसाठी २४ तास सज्ज आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि शांतता, सुरक्षितता व सामाजिक सलोखा जपत गणरायाचा उत्सव उत्साहात साजरा करावा. असे आवाहन श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी वर्धा जिल्हयातील नागरीकांना केले आहे.

11/9/26 पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा, वर्धाआणि शांतता, सुरक्षितता व सामाजिक सलोखा जपत गणरायाचा उत्सव उत्साहात साजरा करावा. असे आवाहन श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी वर्धा जिल्हयातील नागरीकांना केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये