निळकंठराव शिंदे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, प्रमुख पाहुणे सौ. नीलिमाताई शिंदे, संस्थापक अध्यक्षा, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. अजय दहेगावकर ,डॉ. प्रवीणकुमार नासरे व श्री विशाल गौरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच पाहुण्यांचे स्वागताने झाली.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये डॉ. प्रवीणकुमार नासरे यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये दरवर्षी महाविद्यालयातून विविध विषयातुन सर्वाधिक गुणप्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य तसेच भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती यांच्यातर्फे शिष्यवृत्ती व 50 बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येते हा यामागचा हेतू स्पष्ट केला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ. नीलिमाताई शिंदे, संस्थापक अध्यक्षा, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ हे त्याला मिळतच असते ते मग एखाद्या पुरस्काराच्या, नोकरीच्या किंवा स्वावलंबी जीवनाच्या स्वरूपात असते. विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे फक्त त्याचेच नाही तर कुटुंबाचे महाविद्यालयाचे नाव मोठे होते असेही सांगितले.
यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमांमध्ये भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती व महाविद्यालयातर्फे घोषित शिष्यवृत्ती व ५० पुरस्कारांचे वितरण गुणवंत विद्यार्थ्यांना करण्यात आले. या अंतर्गत खालील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कु. साहेबा शेख,कु.सुजाता गौरकार,कु.सुनाक्षी टोंगे,कु.प्रांजली मुन,कु.पलक चुनारकर,प्रथमेश वाढई,कु.जानवी उके,ओम मंथनवार, कु.ईशा सोनुले,कु.श्रुती चौधरी,कु.मेहक शेख,कु.श्रद्धा टापरे,कु.समीक्षा बोढाले,कु.शुभांगी चिवंडे,धीरज वानखेडे,कु.प्रांजली विश्वास,कु.गायत्री शिंदे,कु.निखिल सुंदरगिरी,कु.मासूम शेख,कु.सेजल शर्मा,कु.राजेश्वरी सुंदरगिरी,कु.सोनम विधाते,कु.ज्ञानेश्वरी राऊत,कु.साक्षी वासेकर, वैभव जगताप,कु.अमृता प्रसाद,कु.विश्वरूपा कार्लेकर,कु.गायत्री काळे .
तसेच अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. एल. एस. लडके यांनी विद्यार्थ्यांना तुम्ही युवा असून तुमच्यामध्ये वायू सारखी ताकद आहे ज्याचा उपयोग करून तुम्ही जीवनामध्ये उत्तम अशी कामगिरी करू शकता आणि हे सर्व करत असताना महाविद्यालयातील प्रत्येक व्यक्ती तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करेल व तुमच्या उज्वल भविष्य घडवण्याच्या मार्गामध्ये मदत करेल असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सौ. किरण पाटील तर आभार प्रदर्शन प्रा Lt. डॉ. सचिन श्रीरामे यांनी केले
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.



